उरण दि २९(विठ्ठल ममताबादे ): भारतासह संपूर्ण जगाला अस्थिरतेच्या भोवऱ्यात अडकवणाऱ्या कोरोना विषाणूचे सुमारे तीन वर्षानंतर पुन्हा आगमन झाले आहे.आशिया खंडातील सिंगापूर, थायलंड,चीन आणि हॉंगकॉंग या देशांमध्ये उपद्रव्य मूल्य दाखवण्यास सुरुवात केल्यानंतर कोरोनाने पाय भारतात पसरले आहेत...
केरळ मार्गे भारतात दाखल झालेल्या या विषाणुने आता राजधानी दिल्लीसह,महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक,उत्तर प्रदेश, आणि पश्चिम बंगाल मध्ये उपद्रव्य मूल्य दाखवण्यास सुरुवात केली आहे...
यामध्ये कोरोनाचे जेएन-1 हे नवे प्रतिरूप ही (व्हेरियंट) दाखल झाले आहेत... तथापी देशातील जनतेने कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता सतर्क राहण्याची गरज आहे.. असे आवाहन भारतीय विज्ञान संशोधन संस्था आयसीएमआर ने केली आहे... कोरोनाच्या या प्रतिरूपाचा उपद्रव्य यापूर्वी भारतीयांनी अनुभवलेल्या 'ओमीक्रोन 'या प्रतिरूपापेक्षा वेगळा नाही...त्याच्यावर नागरिकांनी घेतलेली कोरोनाची लस प्रतिकार करण्यास पुरेशी आहे... मात्र, लक्षणे दिसताच आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून त्यावर उपचार करून घेणे गरजेचे आहे...असे आवाहन उरण तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे...