प्रतिनिधी : कांतीलाल पाटील
उरण- दि.२८: उरण तालुक्यातील चिर्ले ग्रामपंचायतमध्ये शेकाप विरोधात काँग्रेस-भाजपा अशी आघाडी आहे... नुकत्याच झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये काँग्रेस-भाजपा आघाडीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांना ०७ मते आणि त्यांचे प्रतिस्पर्धी शेकाप उमेदवार रंजना तुळशीराम मढवी यांना ०५ मते मिळाली... या स्पर्धेत श्रीकांत पाटील हे विजयी झाले...
काँग्रेस-भाजपा युतीचे उमेदवार तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीकांत पाटील यांची निवड ही चिर्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी होताच काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनिष पाटील, भाजपचे युवा नेते समिर मढवी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले... यावेळी सामाजिक कार्यकर्ते व नेते प्रभाकर पाटील, युवा नेते संतोष राम पाटील, भाजप नेते दिपकशेठ पाटील, राजनशेठ घरत, गांव अध्यक्ष विलास मढवी, सदानंद मढवी, माजी सरपंच विजय मढवी दहा गांव प्रमूख विनोद पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, रामनाथ मढवी आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित उपसरपंच श्रीकांत पाटील यांना शुभेच्छा दिल्या...