महाराष्ट्र वेदभुमी

गोवठणे गावातील नहूष म्हात्रे याचे एस एस सी परीक्षेत सुयश

( प्रतिनिधी गोवठणे प्रेम म्हात्रे):  स्वप्न जर गगनभेदि असतील आणि प्रयत्नांची पराकाष्टा त्या दिशेने होत असेल तर यश हे खूप जवळ असते तर एस एस सी बोर्ड परीक्षेत सुविद्या विद्यालय कामोठे येथे नहुष मेघनाथ म्हात्रे एस एस सी  मध्ये 91.40 टक्के पाडून शाळेत तिसरा नंबर पटकावून गोवठणे गावाचे नाव रोशन केले आहे... ग्रामीण भागातील विद्यार्थी हे अतिशय कुशाग्र बुध्दीचे असतात हे नहूष ने सर्वाना दाखवून दिले..

 सदर या घवघवीत यशाबद्दल नहूष चे सर्वच स्तरावर कौतुक केले जात आहे..विद्यालयातील शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व्यवस्था पण कमिटी आपल्या गावाच्या समस्त नागरीक यांनी कौतुक केले आहे....

तसेच आपल्या गावी गोवठणे गावा मध्ये बोलावून त्याचे  काका व प्रसिद्ध यु ट्यूब कलाकार  प्रेमनाथ म्हात्रे श्रीराम म्हात्रे ,प्रदीप म्हात्रे , तसेच भाऊ यश म्हात्रे ,रचित म्हात्रे बहिन श्रेया म्हात्रे यांनी नहुष म्हात्रे यांचे भरभरभरून कौतुक केले आहे.. तसेच भविष्यात सर्व योजनांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत..

Post a Comment

Previous Post Next Post