महाराष्ट्र वेदभुमी

वीज समस्यांनी त्रस्त गावकरी धडकले ‘महावितरण’वर!

 


अन्यथा महावितरण कार्यालयासमोर धडक मोर्चा काढू

ग्रा.पं. सदस्य सचिन दशहरे यांचा कनिष्ठ अभियंता जालंधर यांना इशारा

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक - गावातील वारंवार होणारा खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा महावीतरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य सचिन दशहरे व जितेंद्र सरोदे यांनी वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता जालंधर यांना दिलेला आहे... नगरधन येथे गेल्या एक-दोन महिन्यांपासून अचानक वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे... सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वीजेअभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वीजेची झालेली दरवाढ आणि वेळेवर लाईट बील भरुनही नागरिकांना व व्यापार्‍यांना योग्य पद्धतीने सेवा मिळत नाही... परिणामी इर्न्व्हटर, जनरेटचा आधार घ्यावा लागत आहे, त्यामुळे नाहक खर्च वाढत आहे. वीज प्रवाह अचानक कमी-जास्त होत असल्याने इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बिघडत आहेत... थोडे वादळ व पावसाचे वातावरण तयार झाले की लाईट चार-चार तास तर कधी-कधी रात्रभर येत नाही... त्यामुळे गावातील नागरिकांना रात्रभर जागरण करावे लागत आहे...

भारनियमन जाहीर झालेले नसतानाही वीज खंडित

विज वितरण कंपनीकडून भारनियमन जाहीर झालेले नाही तरीही गेल्या काही दिवसांपासून दिवसभरातून अनेकवेळा लाईट जाते... त्यामुळे नागरिक, व्यापारी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लाईट नसल्याने ग्रामपंचायतच्या पाण्याच्या टाक्या भरणे अवघड होते... अचानक कमी-जास्त विज पुरवठा होत असल्याने घरगुती उपकरणे बिघडण्याचे प्रमाणही वाढले आहे... वादळ-वारा व पावसाचे दिवस जवळ येत असल्याने याचे नियोजन करणे गरजे आहे, परंतु विज वितरण कंपनीचे लक्ष नसल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे... वीज वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत न झाल्यास सर्व गावकऱ्यांसह तीव्र मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही सचिन दशहरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post