माणगाव (प्रतिनिधी): लिटल एंजल्स केजी स्कूलमध्ये मंगळवारी, १३ मे २०२५ रोजी एक अनोखा आणि भावनिक सोहळा अनुभवण्यात आला... एक दशकापूर्वी या शाळेत आपल्या शालेय प्रवासाची सुरुवात केलेले दहावीचे माजी विद्यार्थी आपल्या यशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी पुन्हा आपल्या बालशाळेत परतले...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२४–२५ शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला, ज्यामध्ये लिटल एंजल्स केजी स्कूलचे १० माजी विद्यार्थी यशस्वी झाले... या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची गोड बातमी पेढे वाटून, फुलांच्या हारांनी स्वागत होऊन आणि शिक्षकांचे आशीर्वाद घेऊन साजरी केली...
प्राथमिक शिक्षणानंतर विविध शाळांमध्ये शिक्षण घेतले असले तरी या विद्यार्थ्यांचा भावनिक नातेसंबंध लिटल एंजल्स शाळेशी कायम राहिला... यशानंतर पालकही आपल्या मुलांसह शाळेत आले आणि त्यांनी शिक्षकांचे मनापासून आभार मानले. शाळेतील शिक्षकांच्या डोळ्यांत कौतुकाचे अश्रू दिसले – कारण एकेकाळचे टवटवीत गोंडस विद्यार्थी आता आत्मविश्वासाने भरलेले युवक झाले होते...
विद्यार्थिनी कु. सोनिया रविना रवींद्र गुगले हिनेही शाळेला भेट देऊन आपला आनंद शिक्षकांशी वाटला... संस्थापक मा. पाटील सरांचे आशीर्वाद घेऊन तिने आपल्या यशाचे श्रेय उत्कृष्ट प्राथमिक शिक्षणाला दिले...
दरवर्षीप्रमाणे यंदाही लिटल एंजल्स केजी स्कूलचे माजी विद्यार्थी दहावी परीक्षेत यश मिळवत शाळेच्या गुणवत्तेची आणि मूल्याधारित शिक्षणपद्धतीची साक्ष देतात...
पालकांना आवाहन करण्यात येते की आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी लिटल एंजल्स केजी स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा व त्यांच्या शैक्षणिक पाया भक्कम करावा...
