मुंबई प्रतिनिधी :(सतीश पाटील) : मुंबई उच्च न्यायालयासमोर घडलेली ही घटना केवळ एक बातमी नाही, तर आपल्या व्यवस्थेवरचा थेट आरसा आहे... न्याय मिळावा म्हणून एका युवकाने स्वतःच्या शरीराला आग लावावी लागते, ही बाब किती भयानक आहे?...
न्यायाची दारे उघडी आहेत असे आपण म्हणतो, पण त्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी एखाद्याला स्वतःचा जीव पणाला लावावा लागत असेल, तर ती व्यवस्था कुणासाठी आहे?
हे दृश्य धक्कादायक आहे, विचलित करणारे आहे…आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंतःकरण हादरवणारे आहे...आज एक युवक जळतोय, उद्या न्याय मागण्यासाठी आणखी काय करावं लागेल, हे सांगता येत नाही...न्याय मिळवण्यासाठी माणसाने जिवंत जळणं हे उत्तर असू शकत नाही...
हा केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नाही, हा आपल्या सर्वांचा प्रश्न आहे.
🔴 न्याय वेळेवर मिळाला असता, तर कदाचित हे टोकाचं पाऊल उचललं गेलं नसतं.
🔴 व्यवस्था जागी कधी होणार?
🔴 अशा घटनांनी तरी आपली संवेदनशीलता जागी होणार का?
#मुंबईहायकोर्ट
#न्यायासाठीआक्रोश
#धक्कादायकघटना
#व्यवस्थेचाआरसा
आज न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न सामान्य जनतेला पडतो? आमचे न्याय व गृह खाते कधी गंभीरता लक्षात घेऊन योग्य न्याय देईल! तसेच अनेक शेतकरी देखील न्याय न मिळाल्यामुळे आत्महत्या करीत आहेत? यावर देखील सरकार गांभीर्य पूर्ण लक्ष्य घालणार आहे की नाही? सामान्य जनतेला कोणी वाली नाही का??? सदर घटना सोशल मिडियावर व्हायरल होत आहे...
