महाराष्ट्र वेदभुमी

माय मराठी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

 

पुणे - येथील माय मराठी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माय मराठी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे... त्यात कथासंग्रहासाठी संजीवनी बोकील यांच्या कवडशांचे फूल, कादंबरीसाठी तानाजी धरणे यांच्या हेलपाटा कादंबरीसाठी तर काव्यसंग्रहासाठी धनाजी घोरपडे यांच्या जामिनावर सुटलेला काळा घोडा या साहित्यकृतींची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव बाळासाहेब खरात यांनी दिली...

पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून या पुरस्कारासाठी राज्यभरातून एकूण १०२ साहित्यकृती आल्या होत्या... परिक्षकांनी उत्तम, नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार कलाकृतींची नि:पक्षपणे करून या पुस्तकांची निवड केली आहे...

पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दिनांक १६ मे २०२५ रोजी पत्रकार भवन नवी पेठ पुणे - ३० येथे अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे... संस्थेचे अध्यक्ष सुभाष पाचारणे यांनी सर्व पुरस्कारार्थ्यांचे अभिनंदन केले...

Post a Comment

Previous Post Next Post