महाराष्ट्र वेदभुमी

माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

प्रकाश हायस्कूलमध्ये माझी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळावा 

प्रतिनिधी सचिन चौरसिया

रामटेक :- तालुक्यातील कांद्री माईन (मनसर) येथील प्रकाश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील २००३-०४ बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल २२वर्षांनंतर एकत्र आले... प्रकाश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात त्यांचे गेट-टुगेदर झाले... या माजी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला... शालेय जीवनात शाळेने शिस्त लावत योग्य संस्कार केले... यामुळेच जिवनात अडचण आली तरी खचून न जाता हिमतीने लढा दिला त्यामुळे आमच्या यशस्वी जिवनाचे अंकुर फुलले, असे मनोगत माजी विद्यार्थी व महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी कु कांचन उईके यांनी दिली... प्रकाश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कांद्री माईन (मनसर) येथील २००३-०४ बॅचचा स्नेहमेळावा सोमवारी (ता.१५) उत्साहात पार पडला... कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी गुरुवंदना सादर करून शिक्षकांचा सन्मान केला... शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी १० लेझीम, १० डंबलचे सेट, बॅडमिंटन १०, लगोरीचे १० सेट, फुटबॉल ६, व्हॉलीबॉल ६, लांब उडी दोरी १० सेट असे एकूण ३० हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता उपलब्ध करून दिले... माजी विद्यार्थ्यांनी अनुभव कथनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले... या स्नेहमेळाव्यास कांचन उईके, सचिन घोडेस्वार, रवी नान्हे, मुकेश खोब्रागडे, माला मसराम, प्रिया वर्मा, लक्ष्मी चव्हाण, आशिष कठोते, पुरुषोत्तम भुरे, श्रुती कुंमरे, अर्चना उईके, विलास बर्वे, शैलेंद्र ताकद, राहुल गजबे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post