महाराष्ट्र वेदभुमी

रामटेक'च्या ग्रामीण भागातील तरुणाची 'यूपीएससी' परीक्षेत गगन भरारी


प्रतिनिधी सचिन चौरसिया 

रामटेक :- तालुक्यातील ग्रामीण भागातील परसोडा गावातील कार्तिक मनोहरजी बावनकुळे याने नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे... नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातून यूपीएससी परीक्षेत यश मिळवणारा कार्तिक हा रामटेक तालुक्यातून आयईएस सेवेत निवड होणारे ते पहिलेच अधिकारी व्यक्ती आहेत... या ऐतिहासिक यशाचे संपूर्ण श्रेय कार्तिक बावनकुळे यांनी आपल्या वडील-आई, कुटुंबीय आणि गुरुजनांना दिले आहे... त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंबा, योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळेच हे यश शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे... कार्तिक यांचा शैक्षणिक प्रवास प्रेरणादायी आहे... प्राथमिक शिक्षण प्रोव्हिडन्स स्कूल मनसर येथे झाले असून माध्यमिक शिक्षण एनटीपीसी भवन्स मौदा येथे झाले. तसेच उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी त्यांनी आयआयटी होम येथे मार्गदर्शन घेतले... अभियांत्रिकी शिक्षणासाठी त्यांनी रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (RCOEM) नागपूर येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले... त्यानंतर सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम, शिस्तबद्ध वेळापत्रक आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी युपीएससी ची आयईएस परीक्षा उत्तीर्ण करत हे मोठे यश संपादन केले... ग्रामीण भागातून येऊन देशातील सर्वोच्च व अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवणारा हा प्रवास रामटेक तालुक्यातील असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे... त्यांच्या यशामुळे रामटेक परिसरात आनंदाचे वातावरण असून, विविध सामाजिक, शैक्षणिक व नागरिक स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post