महाराष्ट्र वेदभुमी

माणगाव नगरपंचायत क्षेत्राच्या विकासासाठी मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक

मुंबई प्रतिनिधी -: मंत्रालयातील दालनात माणगाव नगरपंचायत क्षेत्रातील विविध प्रलंबित व सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली...

 बैठकीदरम्यान महत्वपूर्ण सूचना:

• कोअर वर्कसाठी तयार करण्यात येणाऱ्या डीपीआरमध्ये आवश्यक घटकांचा समावेश करण्यात यावा

• ओपन जिम प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाची मंजुरी तातडीने घेण्यात यावी

• रस्ते व ड्रेनेज संबंधित कामे पावसाळ्याच्या अगोदरच पूर्ण करण्यात यावीत

• अमृत २ योजनेअंतर्गत सुरू असलेली सर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्यात यावीत

• सर्व विकासकामांचा दर्जा उच्च दर्जाचा राखण्यावर विशेष भर देण्यात यावा

माणगाव व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मी सातत्याने आढावा घेत असून, प्रत्येक प्रकल्पासाठी पाठपुरावा करीत आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विकासकामांमध्ये गुणवत्ता, गती आणि पारदर्शकता यांना प्राधान्य दिले जात आहे...

या बैठकीस उपनगराध्यक्षा सौ. हर्षदा काळे, नगरसेवक श्री. आनंद यादव, नितीन वाढवळ, रत्नाकर उभारे, लक्ष्मी जाधव, सागर मुंडे, सुमित काळे, मनोज पवार, माणगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post