महाराष्ट्र वेदभुमी

जनतेच्या पैशावर पुन्हा अधिकारी मारतोय डल्ला



गैरप्रकार: आजनी कालव्याच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:-  :- शेतीची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. जलसंधारण विभाग, पाटबंधारे अंतर्गत येणाऱ्या आजनी मायनरच्या बांधकामाला सुद्धा शासनाने २७ कोटी रुपये मंजूर केले. परंतु संबंधित ठेकेदार पेंच प्रकल्पाच्या आजनी मायनरचा कालव्याचे काम दिलेल्या अंदाजपत्रकानुसार न करता पेंच पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कालव्याच्या कामासाठी नियुक्त केलेल्या अभियंता यांच्या संगनमताने या कालव्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करीत आहे. काम सुरू असतानाच काम पुर्ण होण्याअगोदरच कालव्याची अनेक ठिकाणी पडझड होत असुन केलेले काँक्रीटेकडून उखडत आहे. याबाबत कामासाठी नियुक्त केलेले अभियंता रोहित वाघ यांना विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याकडे संबंधित विभागाचे अधिकारी काणाडोळा करीत आहेत. या निकृष्ट दर्जाच्या कामाला कोणाचे पाठबळ वा कोणाची मेहेरबानी आहे? असा सवाल शेतकऱ्यांतर्फे विचारला जात आहे. धरणाच्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामात पुन्हा एकदा उखळ पांढरे होणार हे नक्की.

 १ )  कालव्याचा निकृष्ट दर्जाच्या कामाची तक्रार आजनीचे सरपंच मनोज लिल्हारे सह ग्रामवासियांनी केली आहे. जलसपंदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ही बोगस कामे सुरू आहेत असा आरोप सरपंच मनोज लिल्हारे सह आजनी ग्रामवासियांनी केली आहे...

 २ ) या अगोदर सुद्धा वर्ष २०२१ ला जलसंधारण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीन धोरणेमुळे आजनी गावाला याच्या फटका बसलेला आहे. तालुक्यातील पेच प्रकल्पातून वर्ष २०२१ ला धान लागवडीसाठी प्रशासनने कालव्याला पाणी सोडले. परंतु कामात झालेल्या हलगर्जीपणामुळे व कर्मचाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे कालवा फुटला व फुटलेल्या कालव्याचे पाणी लागूनच असलेल्या आजनी गावात कालव्याचे पाणी शिरल्यामुळे ग्रामवासियांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले होते. परंतु आता या कालव्याच्या बांधकामा करीत शासनाने कोट्यवधी रुपये दिलेले आहे. परंतु परत या कालव्याचे काम मंजूर अंदाजपत्रकानुसार न होता...

 ३) कालव्याच्या कामांना भगदाडे पडत असल्यामुळे पावसाळ्यात आजनी ते चाचेर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. कालव्याच्या निकृष्ट कामाच्या चौकशी तात्काळ व्हावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच मनोज लिल्हारे सह सर्व ग्रामस्थांनी केली आहे.

जनतेच्या पैशावर पुन्हा एकदा डल्ला

पेंच धरणातून मुबलक पाणी मिळेल, सिंचन व्यवस्था सुधारेल, शेती क्षेत्रात वाढ होईल, गळती थांबून पाण्याची बचत होईल हे सांगितले जात आहे. त्यावर पुन्हा एकदा पाणी फिरणार असून, जनतेच्या पैशावर पुन्हा एकदा डल्ला मारला जाणार असून कोट्यवधीचा मलिदा कोणाच्या खिशात जाणार हे गौडबंगाल आहे.

Post a Comment

Previous Post Next Post