लोकप्रतिनिधी नसल्याने विकासाचे तीन तेरा नऊ बारा
प्रशासकीय अधिकारी मस्त जनता त्रस्त
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेकः-महाराष्ट्र राज्यातील बहुतांश महानगरपालिका व नगरपालिका या सर्व कार्यालयातील कारभार सध्या प्रशासकीय अधिर्कायांचा नियंत्रणात आहे. या अगोदर सहा महीन्याचा प्रशासकीय काळ पाहायला मिळायचा. नगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. निवडणूक कधी लागेल आणि नवी सदस्य कधी अस्तित्वात येईल हे तूर्त कुणीच सांगू शकत नाही... स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पड़ल्यामुळे, स्थानिक स्वराज संस्थेच्या कार्यकाळ संपूर्ण प्रशासकाची नियुक्ती जवळपास ३ वर्षा पासुन अधिक आहे... नगरपालिका सदस्य यांचा कार्यकाळ संपला असून प्रशासक आले आहे. शहराचा विकास नगरपालिका माध्यमातुन होतो. मागील ३ वर्षे पूर्ण झाले विकासाच्या सतेची चाबी प्रशासक यांच्या हातात आहे स्थानिक स्वराज संस्थेवर म्हणजे नगरपालिका प्रशासक असल्यामुळे विकासाला खिळ बसुन विकासाचे तीन तेरा नऊ बारा वाजले आहेत. नगरपालिका मध्ये प्रशासक असल्याने नागरीकांना विकासासाठी कोणाकडे जावे हा प्रश्न पडलेला आहे... रामटेकमध्ये वार्डा-वार्डात नागरीकांच्या वाढत्या समस्या आहे वार्डातील स्वच्छता, घरकुल चा प्रश्न, घंटा गाडीचा प्रश्न, शव वाहीनीचा प्रश्न, कचरा गाडी उशिरा येण्याचा प्रश्न विविध प्रश्न नगरपालिका रामटेच मध्ये आहे. नागरीकांचे प्रश्न फफक्त लोकप्रतिनिधी न प. सदस्य यांच्या माध्यमातुन केल्या जातो पण नगर परिषद वर लोकप्रतिनिधी नसल्यामुळे विकासाचे तिन तेरा वाजले आहे... नगर परिषद मध्ये नागरी समस्या फ्फ़क्त लोकप्रतिनिधी मार्फत सोडल्या जातात पण शहरात समस्या अधिक वाढत आहे पण नागरीकांना पेच होत आहे नगर परिषद वर प्रशासकांच्या हाती सतेची चाबी असल्याने नागरीकांना अडचणी वाढल्या आहे... रामटेक भागात विकास बरोबर नाही कोणाचाही वचक राहीला नाही कारण वाली कोणाचा कोणी राहीला नाही भागात फक्त विकासाचा प्रश्न समोर उभा आहे... टॅक्स विभागात भोंगळ कारभार सुरु आहे. टॅक्स भरून करपट्टीवर टॅक्स लावून पाठवतात... फेरफार होऊन तीन वर झाले तरी असेसमेंट नकल वर जुनेच नाव येतात. नगरपालीका मध्ये पीण्याच्या पाण्याची सोय नाही... स्वच्छता विभागातील अधिकारी जागेवर दिसत नाही... मागील २ महीण्यापासुन रामटेक नगरपालिकेची शववाहीनी बंद पडलेली असुन गडर साफ करण्याची मशीन सुद्धा ५-६ महिन्या पासून बंद पडलेली आहे. रामटेक वासीना अत्यविधीसाठी बाहेर गावामधुन शववाहीनी आणावी लागत आहे... सदर प्रशासकीय अधिर्कायांनी सकाळी वार्डात येणारी कचरा गाडी ही ११.०० ते १२.०० वाजता येत आहेत...मंदीरांच्या भिंतीशी, शाळेजवळ दोन- तीन दिवसापासुन कचरा पडलेला असतो तर सर्व वार्डात जोगोजागी कचरा पडलेला असतो.. रामटेकात मोकाट फिरणाऱ्या जनावरामुळे होणारी घाण... कचरा रिक्षा बंद करुन टाकल्या... कचरा गाडीवाल्याला कचरा उचलाला लावला तर तो सरळ प्रशासकीय अधिकारी नी उचलण्यास मनाई केली आहे असा सांगतो. काही कामा निमित्त बोलाला गेले तर जोराने बोलणे, रामटेक नगर पालिकाची मुख्याधिकारी आपले नियम सांगणे, यामुळे नागरीकांना खुब गोष्टी सहन कराव्या लागत असुन प्रशासकीय अधिकारी नगरपालीका मध्ये आपली स्वतःची मनमानी करीत आहेत... राजकीय नेते खासदार व आमदार दूरलक्ष करीत आहे....