रायगड:- अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पावसाळी परिस्थितीचा आढावा, खबरदारी व जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली... या बैठकीला जिल्हाधिकारी मा. श्री. किशन जावळे, पोलिस अधीक्षक आचल दलाल, अलिबाग उपवन संरक्षक मा. श्री. राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मा. श्री. संदेश शिर्के, कार्यकारी अभियंता मा. श्री. जगदीश सुखदेवे, उपविभागीय अधिकारी मा. श्री. मुकेश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक मा. श्री. निशिकांत पाटील यांसह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते...
रायगड जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणावर मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. सद्याची पावसाची आकडेवारी पाहता संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी सर्व यंत्रणानी सदैव दक्ष रहावे.. सर्व दरड क्षेत्रात येणारी गावे, जुने व धोकादायक पूल व साकाव आणि पाणी साठे यांची सर्व विभागांनी पाहणी करून अहवाल सादर करावा. आवश्यकतेनुसार सर्वांनी कार्यवाही करावी तसेच आपत्तीच्या प्रसंगी शासन जनतेच्या पाठीशी असल्याचा विश्वास देण्याबरोबरच आवश्यक ते सर्व मदत कार्य वेळेत करावे असे निर्देश संबंधित अधिकारी यांना दिले...