महाराष्ट्र वेदभुमी

रोहा तालुक्यात संभे गावात धस कोसळली, पहिल्याच पावसाचा गावाला तडाखा,

सुदैवाने जीवित हानी टळली,लवकरच पुर्नवसन करण्याची ग्रामस्थाची मागणी.

कोलाड (श्याम लोखंडे): रोहा तालुक्यात शनिवारी रिम झिम तर रविवारी रोजी रात्री झालेल्या मुसळधार कोसळलेल्या पावसात रात्रीच्या सुमारास संभे गावात धस कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली मात्र सुदैवाने कोणतीही जीवित झाली नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे तर गावातील निलेश यशवंत सानप,संदिप किसन निंगावले यांचे घरांचे तसेच वरची आली येथील सामाजिक सभागृह यांचे मोठे नुकसान झाले आहे तर घडलेल्या घटनेत कोणतीही जिवीतही झालेली नाही तर नागरिकांना ग्रामस्थानी सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.असून गावात भीतीचे वातावर पसरले आहे.तसेच सदरील मंडळ अधिकारी संदेश पाटील आणि तलाठी श्रीनिवास पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली यावेळी माजी सरपंच संजय सानप, पोलिस पाटील अनंत सानप व ग्रामस्थ उपस्थित होते...

तालुक्यातील संभे गावाची भौगोलिक परिस्थिती ही अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ  व दरडीवर असून दरडग्रस्त म्हणून गावाचे नव्याने पुनर्वसन गावालगत असलेल्या वन विभागाच्या गट नं २४० या सुरक्षित जागेत करण्याकरीता ग्रामस्थांची गेली ३० वर्षापासूनची जवळपास मागणी असल्याचे बोलले जात आहे. तर गेली कित्येक वर्षांपासून सुरक्षित स्थळी पुनर्वसन करण्यात यावे यासाठी सदरील खाते यांचेकडे प्रस्तावित मागणी करण्यात आली आहे. तसेच सन २०२१- २०२२ पासून याचा पाठपुरावा म्हणून रायडचे खासदार सुनिलजी तटकरे राज्य मंत्री आदितीताई तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडे सर्व ग्रामस्थ यांनी जोर धरून हे गाव अत्यंत दरडीवर आहे आणि अनेक ठिक ठिकाणी पावसाळ्याचे दरड कोसळ्यांच्या घटना घडत असल्याने या गावाच्या पूर्र्वसनाची ही मागणी पुन्हा त्यांचे कडे करण्यात आली. आणि प्रस्तावास प्रगती मिळाली.तसेच त्याचा पाठपुरावा खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी करत त्याला गती मिळत आहे तसेच दिनांक १२/११/ २३ रोजी मदत पुनर्वसन मंत्री अनिलजी पाटील यांच्या मागणीतील दालनामध्ये महिला व बालकल्याण विकास मंत्री आदितीताई तट‌करे  अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून संभे गावाच्या पुनर्वसन बाबत बैठक पार पडली त्यात पुर्नवसनाचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले नंतर लगेचच१३/१२/२३  रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नागपूर आयुक्त कार्यालयामध्ये पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री अदिती तटकरे , अनिकेत तटकरे तसेच सदरील अधिकारी वर्ग यांच्या समावेत बैठक घेतली या प्रसंगी गावचे अध्यक्ष डॉ मंगेश सानप तसेच ग्राम पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य संजय सानप उपस्थित होते...

तद्नंतर ०८/०४/२०२५ रोजी, राज्याचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कैबिनेट मध्ये, खा. सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांच्या पुढाकाराने गावच्या पुनर्वसन बाबत बैठक घेण्यात आली तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी भुखंड संस्थेमार्फत गावाची पाहणी करत संभे गाव पुनर्वसन करण्याचे आदेश जिल्हा अधिकारी अलिबाग यांना २०/०५/२०२५ रोजी देत JS1 भुखंड संख्या पुणे (सक्रिय (केंद्र सरकार) यांच्या मार्फत पाहणी करण्यात आली. तसेच मंडळ अधिकारी कोलाड यांच्या मार्फत संभे गावाचे पुर्नवसन प्रस्ताव तहसिल कार्यालय रोहा व उपविभागीय कार्यालय रोहा याच्‌याकडे देण्यात आले उपविभागीय कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले असू हि सर्व प्रकीया चालू आहे असल्याचे ग्रामस्थानी सांगितले...

प्रतिक्रिया 

गावच्या विकासात तटकरे कुटुंबीयांचे मोठे योगदान तसेच पुनर्वसन करण्यासाठी खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे माजी आमदार अनिकेतभाई तटकरे अतिशय प्रयत्नशील आहेत वाढत्या पावसामुले या अशा घटना होत राहील्यास येथील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण वाढले आहे. तरी खासदार सुनील तटकरे महिला बालकल्याण मंत्री आदिनीताई तटकरे, अनिकेतभाई तटकरे यांच्या कडे  ग्रामस्थांची मागणी आहे की, आपल्या पुढाकाराने व सहकार्याने  आतापर्यंत संभे गावच्या पुनवसनाच्या प्रस्तारास प्रगती आलेकी आहे असे हे काम आपल्या माध्यमातून लवकरात लवकर करून ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यात यावे ही मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे...संजय सानप माजी सरपंच व सदस्य संभे

Post a Comment

Previous Post Next Post