महाराष्ट्र वेदभुमी

उभ्या ट्रकला मोटर सायकलची मागुन धडक

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- रामटेक-मौदा मार्गांवरील नगरधनजवळ बिघाड झालेल्या उभ्या ट्रकला मागुन जबरदस्त धडक दिल्याने मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. २९ रात्री ७.३० वाजता नगरधन शिवारात घडली... महादेव भीमा लिल्हारे (वय ५३) असे मृताचे नाव आहे... सदर इसम शितलवाडी येथील रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालीचे काम करायचा. महादेव लिल्हारे (वय ५३, अजनी, नगरधन) नेहमीप्रमाणे हे सायंकाळच्या सुमारास बाजार समिती येथून मोटरसायकलने एमएच ३१-बीके ७०८४ गावाला जात असताना रामटेक -मौदा मार्गांवरील नगरधन शिवारात रस्त्याचा बाजूला नादुरुस्त उभा असलेल्या ट्रक एमएच १८-एबी ०१४८ मागून जोरदार धडक दिली त्यामुळे गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच चालक ट्रक सोडून पळून गेला... माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post