कांतीलाल पाटील:(पनवेल प्रतिनिधी): खारघर-पावसाला सुरू होताच पर्यटकांचा आकर्षण असलेला पांडवकडा धबधबा यंदा पर्यटकांसाठी बंद राहणार आहे...
खारघर-तुर्भे लिंक रोडच्या बोगद्याच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने सिडकोने हा निर्णय घेतलेला आहे...त्यामुळे पांडवकडा धबधब्यावर येणारे हजारो पर्यटक नाराज झाले आहेत... बुधवारपासून पाऊस सुरू झाल्याने पांडवकडा धबधब्यावर पाण्याची धार कोसळू लागली आहे.... पावसाची चाहूल लागल्यामुळे पर्यटक पांडवकडा धबधब्यावर येण्यास उत्सुक असतात... मात्र यावेळी खारघर ते तुर्भे लिंक रोड प्रकल्प अंतर्गत धबधब्याला लागून १.७६३ किलोमीटर लांबीचा पाच पदरी भुयारी मार्ग तयार केला जात आहे... बोगदा खोदण्यासाठी आवश्यक असलेली यंत्र सामग्री धबधब्यालगत उभारण्यात आली असून सुरक्षितच्या दृष्टीने पर्यटकांना प्रवेश बंदी लागू करण्यात आलाय... सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सिडकोने ५.४ किलोमीटर लांबीचा खारघर-तुर्भे जोडमार्ग हाती घेतला आहे...या प्रकल्पांतर्गत बोगद्याचे काम १२ महिने सुरू राहणार आहे... भुयारी मार्गाचे काम करताना डोंगर फोडण्यासाठी लागणारी यंत्रणा, कामगारांना प्रकाश मिळावा यासाठी पांडवकडा धबधब्यापर्यंत लोखंडी खांब टाकून स्वतंत्र वीज जोडणीचे काम सुरू आहे... खारघर गुरुद्वार ते पांडवकडा धबधबा दरम्यान असलेल्या नाल्यावर मुसळधार पावसाचे पाणी दुथडी वाहत असल्याने काम करताना अडथळा येऊ नये यासाठी तात्पुरता पण मजबूत रस्ता नाल्यावर मजबूत पुल उभारला जात आहे... डोंगर तोडताना बाहेर पडणारे दगड वाहने सुरक्षित बाहेर आणता यावेत यासाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे... सिडको आंतरराष्ट्रीय कार्पोरेट पार्क दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी तयार करणारा हा प्रकल्प २१०० कोटी रुपये खर्च करून तयार केला जात आहे... सिडकोने हा प्रकल्प ३१ डिसेंबर २०२८ वर्षा पर्यंत हा प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे...