सचिन चौरसिया प्रतिनिधी
नगरधन :- रामटेक तालुक्यातील आजनी ग्रामपंचायत अंतर्गत २७ दिव्यांग बांधवाना ५ टक्के अपंग कल्याणनिधी ३६४००/- रुपयाचे वाटप ग्रामपंचायत कार्यालय आजनी येथे सरपंच मनोज लिल्हारे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामविकास विभागाच्या सन २०१६ चा शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या पाणीपट्टी, घरपट्टी व इतर स्वउत्पन्नाच्या स्रोतांमधून मिळणाऱ्या एकूण रकमेतून ५ % टक्के निधीतून आपल्या गावातील दिव्यांगांना बांधवाना वाटप करण्यात यावा असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहे. तसेच शासन निर्णयानुसार स्वउत्पन्नाच्या १५ % टक्के निधी अनुसूचित जातीतील समाज बांधवावर खर्च करावा लागतो. त्यानुसार (ता. २६) रोजी ग्रामपंचायत कार्यालय आजनी येथे २७ दिव्यांग बांधवांना ५% टक्के निधी अंतर्गत धनादेशचे वाटप करण्यात आले. तसेच गावातील अनुसूचित जाती अंतर्गत समाज बांधवाना १५ % टक्के निधी अंतर्गत गावातील २२ लाभार्थ्यांना पाणी कॅनचे वाटप सरपंच मनोज लिल्हारे व ग्रामसेविका बांडबूचे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच बिरजलाल उपराडे, रोजगार सेवक जगदीश उपराडे, संगणक चालक नेहा बसिने, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण दमाहे, कल्पना लिल्हारे, सविता मोहनकर, आरती नागपुरे, मनोज उपराडे, देवराज दमाहे, उर्मिला बावणे, नंदा पारधी, ग्रा.पं. कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.
