सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- तिर्थक्षेत्र अंबाळा रामटेक येथे भारतीय जनसेवा मंडळ रामटेक, अंबाळा येथील ब्राह्मण वृंद तसेच रामटेक येथील जनतेच्या सहकार्याने गंगादशहरा दीप महोत्सव ५ जून २०२५ ला आयोजित केले आहे. ५ जूनला सायंकाळी ४ वाजता अगस्ती आश्रम येथील अखंड ज्योतीला दुसरी ज्योत पेटवून जैन मंदिर मार्गे बर्वे स्कुल, झेंडा चौक, गांधी चौक, लंबे हनुमान मंदिर मार्गे अंबाळा येथे ज्योत वाजता-गाजत पोहचेल. सायंकाळी ६ वाजेपासुन ब्राह्मण वृंदाच्या स्रोत्र पठनाने गंगा-दशहरा महोत्सव ची सुरूवात होईल... सायंकाळी ७ वाजता महाआरतीच्या अंबाळा तलावाच्या मधभागी विसर्जन होईल. ह्या वेळी ज्ञानीदास महाराज, कैलासपुरी महाराज सहित अन्य संत, अंबाळा येथील ब्राम्हण वृद, रामटेक नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित राहतील. यावेळी तलावाच्या मधभागी भव्य आतिश -बाजी केली जाते. खंडीत गंगा दशहरा महोत्सवाची सुरुआत अनेक वर्षापूर्वी स्वर्गीय संत गोपाल बाबा यांनी केली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे शिष्य तुकाराम बाबा यांनी परंपरा चालू ठेवली. संत तुकाराम बाबाच्या निधनानंतर आता ही परंपरा भारतीय जनसेवा मंडळ रामटेक, अंबाळा येथील ब्राह्मण वृंद तसेच रामटेक येथील जनतेच्या सहकार्याने चालू आहे. अंबाळा तीर्थक्षेत्र विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे... भारतीय जनसेवा मंडळाने कार्यक्रमाचा लाभ घेण्याची विनंती नागरीकाना केली आहे... कार्यक्रम यशस्वितेकरिता भारतीय जनसेवा मंडळचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, माजी आमदार व मंडळाचे सचिव डी. मल्लीकार्जुन रेड्डी, धनराज काठोके, चंद्रकांत ठक्कर, सुभाष बघेले, शेखर बघेले, विनायक डांगरे, शंकरराव चामलाटे, रुषी किंमतकर सहित राहुल धनकर, सुशिल पडोळे, अरुण चौक, सुभाष मुळे, प्रशांत धनकर, अमोल मठकर, अजय जोशी, गोपाल काठोके, चंद्रकांत संगीतराय, रवि ठाकरे, धनराज नागपुरे सहित आदि प्रयत्नं करीत आहेत.