पुगाव - रोहा (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यात शैक्षिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित रा. ग. पोटफोडे हायस्कूलचा यंदाचा इयत्ता दहावीचा निकाल, ९७.८२% लागला तर विद्यालयातील कु.प्रांजल बबन येळकर हिने ९०.८८% गुण संपादित करून वर्गात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला...
सन २०२४-२०२५ घेण्यात आलेल्या यंदाच्या एस.एस.सी. बोर्डाचा निकाल मंगळवारी १३ में रोजी दु.१ वा.सायबर कॅफे अथवा इंटरनेट मोबाईलवर ऑनलाईन माध्यमातून जाहीर झाला असून परीक्षेत रा. ग. पोटफोडे विद्यालयाचा एकूण निकाल ९७.८२% लागला तसेच पुगाव गावची कन्या कु.प्रांजळ बबन येळकर हि ९०.८८ % गुण मिळवून प्रथम आली , श्रावणी रवींद्र लाडगे ९०. ४०% द्वितीय,कुणाल केशव मोहिते ८८. २०% तृतीय, प्रथम मयूर मोरे ८६. २०% चतुर्थ,
तसेच स्नेहा संतोष भगत ही ८५. ८०% गुण मिळवून पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे तर उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांबचे विद्यमान अध्यक्ष महेंद्रशेठ पोटफोडे, भाई पोटफोडे, संचालक शंकरराव म्हसकर, सचिव धोंडू कचरे, रामशेठ कापसे,रामचंद्र चितळकर, वसंत मरवडे, धनाजी लोखंडे, राम मरवडे, मारुती खांडेकर, बाबुराव बामणे, गजानन भोईर, विजय पवार, सागर मोरे, संजय भिसे, बाळाराम धामणसे, हरिश्चंद्र धामणसे, प्रकाश थिटे, प्राचार्य सुरेश जंगम, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी वर्ग संस्थेचे संचालक, सदस्य तसेच पालक वर्ग, विभागातील पुगाव गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणराव धनवी, ग्रामस्थ नागरिक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...
