महाराष्ट्र वेदभुमी

रोहयाच्या एम.बी.पाटील स्कूलचा १००% निकाल यंदा शाळेतील मुलींनी मारली बाजी


रोहा - प्रतिनिधी ;- एम.बी.पाटील स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरसे,ता .रोहा या स्कूलने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत याही वर्षाचा एस.एस.सी. मार्च २०२५ बोर्ड परीक्षेचा निकाल १००% लावला आहे.


या स्कूलचा गेली अनेक वर्षे १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल हा चांगला लागत असल्याने पालकवर्गातून देखील समाधानाची भावना व्यक्त होताना दिसत आहे. या वर्षीच्या निकालात या शाळेतील अनुष्का नितीन वाटवे या विद्यार्थ्यीनीने ९४.८० % गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे. 


तर द्वितीय क्र. सृष्टी सचिन मोरे हिला ९२.४०%, तर 


तृतीय क्र. मधुरा अनिल अष्टीवकर हीने ९१.६० % गुण प्राप्त करून या शाळेच्या लौकिकात भर घातली आहे. विद्यार्थ्यांच्या या सुयशाबद्दल शाळेचे चेअरमन मधुकर पाटील, पी. जी. देशपांडे सर, मच्छिंद्र पाटील, मुख्याध्यापिका पुनम देसाई यांनी तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post