महाराष्ट्र वेदभुमी

श्रमिक विद्यालय चिल्हे शाळेचा निकाल ९३.९३% कु.तनिष्का पेटकर ९०.२८% मिळवून वर्गात प्रथम.


यंदा मुलींची बाजी 

कोलाड प्रतिनिधी :- रोहा तालुक्यातील शैक्षिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे शाळेचा इ.१० वी बोर्डाच्या परीक्षेचा एकूण निकाल ९३.९३% लागला असून कु. तनिष्का नरेंद्र पेटकर या विद्यार्थीनीने ९०.२८% इतके गुण संपादित करून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकावल्याने तिचे सर्वत्र कौतूक होत आहे...

नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे या विद्यालयाने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखून ठेवलीय... तर कु. तनिष्का नरेंद्र पेटकर या विद्यार्थीनीने ९०.२८% इतके गुण संपादित करून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.तर द्वितीय क्र. प्रितम प्रितेश मोरे ९०.००%, तृतीय क्र. श्रद्धा विजय कान्हेकर ८७.००%, चतुर्थ क्र. दुर्वा राजेश सुटे ८४.००%, तर पंचम क्र. रिद्धी मंगेश गोविलकर ८३.४०% यांनी पटकावले असून यंदाच्या इयत्ता दहावीच्या निकालात मुलींची मोठी बाजी असल्याचे दिसून येत आहे...

विद्यार्थी वर्गाच्या या सुयशाबद्दल संस्थेचे चेअरमन महेंद्र पोटफोडे, उपाध्यक्ष रामशेठ कापसे, सचिव धोंडू कचरे,तर विभागातील धनाजी लोखंडे, मारुती खांडेकर वसंतराव मरवडे, राम मरवडे, बाळकृष्ण बामणे, गजानन भोईर, सुभाष माठल, सर्व संचालक मंडळ तसेच सरपंच रविंद्र मरवडे, वसंत भोईर, सह विभागातील सामाजिक तथा शिक्षण प्रेमी तसेच शा. व्य. समीती मुख्याध्यापक दिपक जगताप व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच विभागातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी अभिनंदन व्यक्त करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post