कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात नामवंत असलेल्या कोकण एज्युकेशन सोसायटीच्या मेहंदळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रोहा इयत्ता दहावचा शाळांत परीक्षेचा एकूण निकाल ९८.४६ टक्के लागला असून यात मनस्वी राजेश मांजरेकर या विद्यार्थीने ९६.२० गुणांची बाजी मारत वर्गात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे त्याबद्दल तिचे शाळेसह सर्वत्र कौतुक होत आहे...
तालुक्यातील मेहंदळे हायस्कूल या विद्यालयाने आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखून ठेवली आहे तर मनस्वी राजेश मांजरेकर या विद्यार्थीने ९६.२० इतके गुण संपादित करून विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.तर द्वितीय क्र. सिमरन राजेश जाधव ९३.४०%, तृतीय क्र. हर्षल अशोक ठोसर ९०.४०%, चतुर्थ क्र. अवधूत केतन भोसले ९०.२०%, तर पंचम क्र. निहान गोविंद डाळे ८९.००% यांनी पटकावले असून यंदाच्या इयत्ता दहावीच्या निकालात सर्वात मोठी बाजी मारली गुण गुणसंपादित केले.त्यामुळे या शाळेतील सर्व यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी वर्गाचे तसेच कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, कमिटी व्यवस्थापन, चेअरमन श्री संदीप मधुकर गांगल साहेब. शाळेचे मुख्याध्यापक श्री मोसे सर व सर्व शिक्षक वृंदांचे , तसेच सर्व पालक वर्गाचे खूप खूप अभिनंदन होत आहे..
