महाराष्ट्र वेदभुमी

रोह्याची कु सिद्धी संतोष सातपुते बी ए एम एस डॉक्टरची डिग्री उत्तीर्ण,

एम डी शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न.

प्रतिनिधी शहानवाज मुकादम रोहा):रोहा येथील पत्रकार श्री संतोष सातपुते व शिक्षिका सौ श्वेता संतोष सातपुते यांची सुकन्या कु.सिद्धी संतोष सातपुते हि बी ए एम एस डॉक्टर मुंबई विद्यापीठाच्या बी आर हर्णे आयुर्वेदिक महाविद्यालय वांगणी बदलापूर येथून ही परीक्षा उच्च गुण मिळवून उत्तीर्ण झाली असुन ही कन्या बी ए एम एस डॉक्टर झाल्याने तिचे सर्वत्र कौतूक होत आहे  तर आई सौ श्वेता संतोष सातपुते यांची इच्छा आहे... त्यासाठी ती अधिक एम डी शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असून स्वप्न साकार करण्याचे ध्येय आहे...

डॉ कु. सिद्धी संतोष सातपुते ही लहानपणापासून गुणवंत आणि हुशार असून आई वडील  उच्च शिक्षित आपली मुलगी डॉक्टर व्हावी ही तीच्या आई-वडिलांचे व आजी,मामा मावशीचे  स्वप्न होते ते तिने पूर्ण केले... तीचे संपूर्ण प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हे जे एम राठी स्कूल रोहा, येथे पूर्ण करत तिने मोठ्या जिद्दीने व मेहनतिने बी ए एम एस पूर्ण करून ती उत्तीर्ण होऊन तिचे अधिक स्वप्न साकार केले...समाज घटकातील श्रमजीवी, कष्टकरी गरीब गरजूंना चांगले उपचार व त्यांची सेवा हातून घडावी यासाठी पुढे एम डी चे उच्च शिक्षण शिक्षणासाठी प्रयत्नशील असल्याचे" कु.सिद्धी हिने सांगितले...

सातपुते परिवारातील या मुलीनी उत्तम शिक्षण घेत एक चांगले नावलौकिक मिळवले आहे...  तिचा भाऊ यश संतोष सातपुते हा देखील नाशिक येथे  बी डी एस (डेंटिस्ट )चे शिक्षण घेत आहे... तर सिद्धी ही बी ए एम एस परीक्षा उच्च गुणांनी उत्तीर्ण झाली असुन ती शिंपी समाजातील मुलगी आहे फक्त शिंपी समाजाचेच नाही तर संपूर्ण रोहा परिसराचे नाव रोशन केले आहे...  तिच्या यशाबद्दल   सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, समाज बांधव व पत्रकार, कंपनीतील अधिकारी वर्ग, शिक्षक वर्ग,तरुण वर्ग यांनी व्यक्तिशः तसेच मोबाईल वॉट्सअपद्वारे अभिनंदन तसेच शुभेच्छांचा वर्षाव होतोय...

Post a Comment

Previous Post Next Post