दि: 19डिसेंबर 2025
मुंबई प्रतिनिधी:(सतिश पाटील): नवीन पनवेल: आज दुपारी साडेबारा वाजता झालेल्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अर्थात महापारेषणच्या २२० के. व्ही. टीएसएस-टिंबरमार्ट वाहिनी बंद पडली... आगीमुळे महापारेषणच्या वाहिनीवरील कंडक्टर आगीत पडला... त्यामुळे वाहिनीखालील वाहने आगीत भस्मसात झाली...
दरम्यान, महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच स्थानिक अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आटोक्यात आणली... त्यामुळे पुढील अनर्थ टळला... महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली संचालक (संचलन) श्री. सतीश चव्हाण यांच्या सूचनेनुसार श्री. महेश भागवत, कार्यकारी अभियंता श्री. आशीष जोशी, श्री. भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आग तत्काळ आटोक्यात आणून पुढील दुर्घटना टळली असून विद्युतपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दपातळीवर रात्रीवर सुरू होते...
अति उच्चदाब वाहिनी १९६२ पासून अस्तित्वात असून या वाहिनीद्वारे कोयना विद्युत प्रकल्पामधून मुंबई आणि उपनगरांना वीजपुरवठा केला जातो... वीजवाहिनीखाली घरे, गुरे बांधू नये...असे आवाहन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने सर्व नागरिकांना केले आहे...अशी माहिती पत्रकार: कृष्णा गायकवाड यांनी दिली...
