महाराष्ट्र वेदभुमी

खांब ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल दहावीचा निकाल १००%,आर्या लोखंडे८५% गुण मिळवून प्रथम.

कोलाड (श्याम लोखंडे): रोहा तालुक्यातील तसेच खांब विभागात इंग्रजी क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या मंजुळा एज्युकेशन वेल्फेअर अँड सोसायटी खांब ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल  १० वी चा निकाल १०० % लागला असून ८५.२० % गुण संपादित करून आर्या लोखंडे ही वर्गात सर्व प्रथम आलीय...

ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल खांब या शाळेचा प्रथमच इयत्ता दहावीचा वर्ग असतानाच प्रथम वर्षात येथील विद्यार्थी वर्गाने यशस्वी गुण मिळवून शाळेला शंभर टक्के निकाल देत गुणांची बाजी मारली असून या इंग्रजी शाळेत शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थी सुरज पवार यांनी मात्र कमाल करत ७०% हून अधिक गुण संपादित करत एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवला असल्याने शाळेसह त्याचे सरकार कौतुक होत आहे...

ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल खांब शाळेचे एकूण सहा विद्यार्थी या परीक्षेत बसले होते ते सहाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवून बाजी मारली तर शाळेला शंभर टक्के निकाल देत मंगळवारी दुपारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या इयत्ता दहावी निकालमध्ये आर्या लोखंडे हिने ८५.२०% गुण मिळवून वर्गात प्रथम क्रमांक पटकावला तर साक्षी मोहिते ८०.२० % गुण संपादित करत द्वितीय क्रमांक पटकावला तसेच सोहम तुपकर ७८.८०% गुण संपादित करत तिसरा आला.त्याच बरोबर जय डवले ७५.८०% विघ्नेश महाडिक ७४.२०% सुरज पवार ७०.०० % सह विद्यार्थ्यां उत्तीर्ण झाले तर विद्यार्थी वर्गाच्या या सुयशाबद्दल चेअरमन तसेच संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे, उपाध्यक्ष सुधीर लोखंडे, डॉ श्याम भाऊ लोखंडे,संस्थेचे सर्व संचालक मंडळ, तसेच परीक्षा प्रमुख मुख्याध्यापिका रिया लोखंडे सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच खांब विभागातील शिक्षणप्रेमी नागरिक यांनी अभिनंदन व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post