महाराष्ट्र वेदभुमी

स्वतःसोबत देशाचा विकास साधणारे छंद विद्यार्थ्यांनी जपावेत-रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील

उरण प्रतिनिधी: शासनाच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत...उरणातील सुप्रसिद्ध विद्यालय असलेल्या एन.आय. हायस्कूलमध्ये प्राचार्य भोये यांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत...

त्यापैकी छंद या विषयावर कविसंमेलन घेतले असता आपले विचार अध्यक्षपदावरून विचार मांडताना रायगडभूषण प्रा एल बी पाटील म्हणाले की आपण आपला वैयक्तिक स्वार्थ न पाहता देशाच्या हितासाठी छंद सांभाळत जावे...यावेळी प्रा एल.बींनी विनोदी कविता आणि आगरी बोलीमध्ये पसायदान सादर केले... प्राचार्य भोये यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचे स्वागत तर सूत्रसंचालन आर.ए.खेडकर यांनी केले...

 कोमसाप उरणचे अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, कोमसाप सचिव अजय शिवकर, ज्येष्ठ कवी अनिल भोईर,बी एस.गायकवाड, करमाडेसर, आदर्श शिक्षक संजीव पाटील यांनी मार्गदर्शन करणा-या कविता सादर केल्या विद्यार्थ्यांमध्ये"आई" या विषयावर अनामिका राम,"कष्ट" तेजस्विनी गायकवाड, "पाऊस" स्वेता बोलके,"चल रे भोपळ्या "श्रेया पटवर्धन,"विश्वास" सपना शर्मा यांनी सादर केलेल्या कवितांनी ज्येष्ठ कवी प्रमाणेच विद्यार्थ्यांना आनंद दिला...

   याप्रसंगी रायगडभूषण प्रा.एल.बींनी "नफरत v/s मोहोब्बत" आणि मच्छिंद्र म्हात्रे यांनी "कवितांची विशेष पुरवणी" यांची भेट हायस्कूलच्या वाचनालयाला दिली... पर्यवेक्षिका एस.एस.पेंडसे, क्रेडिट सौ.अध्यक्षा दिपाली म्हात्रे, एक.टी.जाधव, आर.एल.  चौधरी, तडवी, यांची विशेष उपस्थिती होती...कार्यक्रमाचे आभार कर्मचारी संघाचे अध्यक्ष एस.जी.पाटील यांनी मानले...

Post a Comment

Previous Post Next Post