महाराष्ट्र वेदभुमी

कोलाड पाटबंधारे खात्याचा मनमानी कारभार,कालव्याला पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान,

नुकसान भरपाईची मागणी

पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर):कोलाड पाटबंधारे विभागाने कालव्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च केला...परंतु अद्याप हि कामे पूर्ण झाली नाही या उलट काही ठिकाणी सुरु असणारा कालव्याचा पाणी यावर्षी बंद करून येथील शेकडो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे... याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे....

    कुंडलिका सिंचनातून उजव्या तिरातून पुई गोवे गावाच्या भातशेतीला पाणीपुरवठा केला जातो... परंतु मुंबई-गोवा हायवेवरील चौपदरीकरणाच्या कामात हायवे वरून जाणारा पाणीपुरवठा करणारा चेंबर ठेकेदाराच्या मनमानी नुसार तोडून टाकला तो पुन्हा बांधून पाणी पुरवठा सुरळीत सरू करावा यासाठी गोवे व पुई ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते...यानंतर पाटबंधारे खात्याच्या अधिकारी यांनी सदर ठिकाणी भेट दिली...व नवीन बांधकाम लवकर करून पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले होते....

     यावेळी भातशेतीला पाणीपुरवठा करणारा चेंबर बांधून देणे किंवा इतर मार्गानी भातशेतीला पाणी पुरवठा करून देणे हे काम वेळेवर झाले नाही तर येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल असा इशारा गोवे ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र शेठ पोटफोडे यांच्या कडून संबंधित ठेकेदार व पाटबंधारे खात्याचे अधिकारी यांना देण्यात आला होता...

        यानंतर चेंबर तोडून त्याचा बांधकाम करून त्याला पाईप जोडून तो पुढील कालव्याला जोडण्यात आला... परंतु याला दोन महिने निघून गेले यामुळे पाणी सोडण्यास उशीर झाल्यामुळे यावर्षी भातशेतीला पाणी सोडण्यात आले नाही...व नंतर पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आले की या वर्षी कालव्याच्या दुरुस्तीची कामे केली जातील पण दरवर्षी प्रमाणे पाणी येणार म्हणून शेतकऱ्यांनी बिबियाणे व रासायनिक खते खरेदी केली... व मशागतीची कामे केली...परंतु अचानक पाणी न सोडल्यामुळे गोवे व पुई येथील शेकडो शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असुन याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे...

       १५ वर्षांपूर्वी रोहा तालुक्यातील सर्व परिसर सुजलाम सुफलाम होता.परंतु कोलाड पाटबंधारे खात्याकडून डावा व उजव्या तिराच्या कालव्याच्या दुरुस्तीची करोडो रुपयाची कामे गेली चार पाच वर्षांपासून सुरु आहेत ती अद्यापही पूर्ण झाली नाहीत.. यामुळे संपूर्ण रोहा तालुक्यातील भातशेतीला पाणी नाही...यामुळे या परिसरातील विहिरीनी तळ गाठला आहे... यामुळे काही ठिकाणी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.तर गुरे ढोरे यांना ही पाणी मिळत नाही...यामुळे कालवा दुरुस्तीची कामे लवकरच लवकर पूर्ण करून कालव्याला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे...

Post a Comment

Previous Post Next Post