महाराष्ट्र वेदभुमी

ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव गगणाला भिडले,संपूर्ण बजेट कोलमडले


पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर)

 सद्या लग्नसराई जोरात सुरु असुन या लग्नसराईत सोन्याच्या भावात रेकॉर्डब्रेक भाववाढ झाली असुन याचे दर ९८ हजार रुपयांवर गेले असल्यामुळे सामान्य लोकांच्या जीवनातील खर्च वाढला आहे.यामुळे लग्न समारंभामधील बजेट कोलमडले असल्याचे चित्र पहावायस मिळत आहे...

    जसजसे व्याज दर कमी होतात तसतसे सोन्याचे दर वाढतात कारण सोने ठेवण्याची संधी खर्च इतर गुंतवणूकीच्या तुलनेने कमी असतो.जेव्हा मोठया पैश्याचा पुरवठा होतो... म्हणजेच मध्यवर्ती बँका अधिक पैसे कर्ज देण्यास प्रोत्साहीत करतात. तेव्हा व्याज दर कमी होतात...यामुळे सोन्याचे दर वाढू शकते व महागाई हि वाढू शकते...

 सोन्याचे दर वाढल्यामुळे सामान्य लोकांना अधिक सोने खरेदी करणे अधिक खर्चिक होते... सोन्याचे भाव वाढल्यास त्याचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या बजेटवर होतो... सोन्याच्या किंमती वाढल्यास दागिन्यांची किंमत वाढते... यामध्ये मध्यम व गरीब लोकांच्यासाठी ते खरेदी करणे कठीण होते... तसेच सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सोन्याचे भाव हानिकारक ठरू शकतात.कारण त्यांना ते विकण्यासाठी जास्त पैसे मिळातात.परंतु ते खरेदी करतांना जास्त पैसे मोजावे लागतात...यामुळे बजेट मध्ये बद्दल करावा लागतो...यामुळे ऐन लग्नसराईत सर्व बजेट कोलमडले असल्याचे दिसून येत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post