रोहा प्रतिनिधी : युवा ग्रामीण पत्रकार संघ नांदेड संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांच्या पुढाकाराने रोहयाचे पत्रकार अनंता म्हसकर यांची रोहा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे...
रोह्यातील कर्तव्यदक्ष पत्रकार अशी ओळख अनंता म्हसकर यांची असून समाजात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपल्या लेखणीच्या धारदार प्रहाराने समाजाचे हित जोपासण्याचे काम ते करीत आहेत..सद्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनेल मध्ये ते कार्यरत आहेत... त्यांच्या कार्याची दखल घेऊन युवा ग्रामीण पत्रकार संघ नांदेड यांच्या वतीने त्यांची रोहा तालुका अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे... त्याबद्दल त्याने संघटनेचे आभार व्यक्त केले...
प्रतिक्रिया:
युवा ग्रामीण पत्रकार संघ नांदेड यांच्या वतीने मला मिळालेल्या पदाचा मी सदैव समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी तत्पर राहीन... मी अनंता नामदेव म्हसकर माझी रोहा तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार..
तसेच समाजामध्ये चांगल्या व वाईट गोष्टी घडत असतात तरी ज्या गोष्टी चांगल्या घडतात त्यांचा आवरण उल्लेख कौतुक केला जात असतो.. त्यांना प्रसिद्धी देण्याचे काम मी सातत्याने आपल्या लेखणीतून करत राहीन... तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक ,सांस्कृतिक समाजाचा प्रतिबिंब दाखवण्याचा एक मात्र साधन तो म्हणजे पत्रकार... त्यामुळे आपल्या संघटने मार्फत मी हे सर्व लेखणीतून प्रखर दाखवण्याचा प्रयत्न करेन..अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली..
