महाराष्ट्र वेदभुमी

" मैदान घेणार ! " कोमसाप कवींचा निर्धार...

  

उरण प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मधुबन कट्ट्यावर १७ एप्रिल रोजी अरविंद घरत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवींच्या जागरात " उरणकरांना मैदान मिळवून घेणारच " असा निर्धार सर्वच कवींनी आपल्या कवितांमधून जाहीर केला. कवींच्या आवाहनाला उपस्थित उरणकरांनी टाळ्यांची दाद देऊन पाठिंबा जाहीर केला... कोमसाप उरण शाखाध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, कार्याध्यक्ष रंजना केणी,अजय शिवकर, संजीव पाटील,संपदा पाटील,भरत मढवी,न.ग.पाटील, भालचंद्र म्हात्रे,अनुप शिवकर, अनामिका राम,सपना शर्मा, मारुती तांबे इत्यादी कवींनी जागराच्या चिड निर्माण करणा-या कविता सादर केल्या.या वेळी या जागराला रायगडभूषण प्रा एल बी पाटील यांच्या आगरी बोलीतील पसायदानाने सांगता केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय होळकर यांनी जोशपूर्ण केले...

   यावेळी समाजातील समाज सेवक  उत्कर्षचे गोपाळ पाटील,द्रोणागिरी स्पोर्टसचे अध्यक्ष महादेव घरत, लोकपरंपरा नृत्य संस्थेचे मालक दत्ता भोईर, उरण पनवेलचे सुप्रसिद्ध उद्योगपती अनंत माळी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि गायक प्रकाश तांडेल,न.ग.पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला...यावेळी चंद्रकांत मुकादम,संजय कैणी... दत्ताराम नीळवर्ण, यांना सन्मानित करण्यात आले...

Post a Comment

Previous Post Next Post