उरण प्रतिनिधी :शैक्षणिक वर्ष 2025/ 26 या वर्षात पीएमश्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुळेखंड या शाळेतील नवागतानी तसेच सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी आज दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी मुळेखंड फाटा ते साईबाबा मंदिर परत मुळेखंड शाळा अशी मिरवणूक काढून या वर्षात शाळेत दाखल होणाऱ्या सर्व नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत रायगड जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक माननीय श्री सुनीलजी भोपळे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले... सुरुवातीला मुळेखंड फाटा येथे ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री प्रकाश पाटील व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री.महेश म्हात्रे यांनी बैलगाडीला पुष्पहार घालून सुरुवात झाली नवागत मुलांना डोक्यात टोप्या, पुष्पगुच्छ देऊन त्यांना नाविन्यपूर्ण सजवलेल्या बैलगाडीत बसवून त्यांच्यापुढे लेझीम व ढोल ताशावर वाजत गाजत अशी ही मिरवणूक काढण्यात आली... मराठी शाळेच्या मुलांचीही आगळीवेगळी मिरवणूक पाहण्यासाठी अनेक पालक, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सहभागी झाले होते...सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना मराठी शाळेत इयत्ता पहिलीमध्यै मोफत प्रवेश सुरू असून ही तालुक्यातील एकमेव पी.एम.श्री शाळा आहे शाळेचा परिसर, रंगरंगोटी सजावट व सर्वांगीण विकासासाठी सर्व शिक्षक कार्यतत्पर असून या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना दाखल करावे... असे आवाहन करण्यात येत आहे आजच्या या कार्यक्रमात जवळजवळ नवागत विद्यार्थी म्हणून 15 विद्यार्थी सहभागी झाले होते...
निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत व NEP 2020 मार्गदर्शक सुचनांचे पालन करून या शैक्षणिक वर्षांची सुरुवात करण्यात आली आहे...असे मत शाळेचे मुख्याध्यापक श्री.अमृत ठाकूर सर यांनी व्यक्त केले...या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन उपक्रमशिल शिक्षक श्री.संजय होळकर सर सौ.दिशा तांडेल मॅडम सौ.अर्चना पाटील मॅडम चारही अंगणवाडीताई यांनी केले होते... या उपक्रमात गावातील समाजसेवक श्री.नरेंद्र म्हात्रे, श्री.लांगी चाणजेफाटा,श्री.प्रशांत कोळी सर,सर्व पालकवर्ग उपस्थित होते...
