महाराष्ट्र वेदभुमी

लाखोंचा खर्च, कालव्याची दुरूस्ती आणि साफसफाई निकृष्ट दर्जाची;पाण्याअभावी कालवा कोरडा,जबाबदार कोण?

ठकेदाराच्या कामावर अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, 

कोलाड(श्याम लोखंडे):कालव्याच्या सफाईत पाटबंधारे खात्याला काही घेणे देणे नाही कामाची दुरूस्ती त्यात गाल काढून साफसफाई करणे कोरोड़ोंचा खर्च,नियोजन शून्य शेतकऱ्यांसाठी पाण्याचा पत्ताच नाही, अनेकदा निवेदन,खात्याची समस्या कायम, नियंत्रण कोणाचे, खर्च करूनही पाण्याअभावी कालवा कोरडाच याला जबाबदार कोण हाच प्रश्न गेली अनेक वर्ष खांब ते धामणसई अष्टमी शेतकरी ग्रामस्थ नागरिकांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे...


रोहा तालुक्यातील कुंडलिका सिंचनाखालील डोलवहाळ पाठबंधारेचे उजवा तीर डावा तीर कालवे  या कालव्यांना गेली तेरा चौदा वर्षे पाणी नसल्याने झाडे झुडपं माती घनकचरा यानेच भरल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत एवढेच नव्हे तर या  कालव्यांचे चक्क पाटबंधारे खात्याकडून गेली तेरा ते चौदा वर्षे केवळ काळवाच केला असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग गेली अनेक वर्षे दुबार भात पिकांपासून वंचित राहिले आहेत. एवढेच नव्हे तर भात शेती देखील नापीक होत असल्याने जमीन एजंट मंडळीं शेत जमीन खरेदी विक्री करण्यासाठी त्यांचे हेलपाटे आणि बळीराजाला आमिष दाखवण्याचा कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे...

संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून समजला जाणारा तसेच शेतात राब राब राबून अन्न धान्य साठा निर्माण करून देणारा शेतकरी बळीराजा आज या ना कारणाने गांजला आहे अनेक संकटाना तोंड देत आहे त्यामुळे ईडा पीड़ा टळो बळीचे राज्य येवो। हि म्हण आता भात कोठार म्हणून इतिहासात जमा झालेल्या रायगडातुन हद्दपार झाल्याचे चिन्ह दिसत आहेत, शेतीला सोडाच मानवी स्वच्छता गुंरढोराना मागील तेरा चौदा वर्षांपासून कोलाड़ पाठबंधारे अभूत पूर्व पुई पुगांव खांब वगळता नडवली चिल्हे देवकान्हे मालसई धामणसई निडी तर्फे अष्ठमी तसेच आंबेवाड़ी किल्ला लांढर निवी भूवनेश्वर आशा गावांना पाणी नाही, त्यात डावातीर समजले जाणारे आंबेवाडी लांढर निवी कालव्यासाठी तसेच या कालव्याच्या रखडलेल्या कामाची दुरुतीचे तसेच त्याची सफाईचे काम करण्यासाठी या विभागातील बळिराजा शेतकरी संघटना चांगलीच एकटवली अनेकदा संबंधित खाते अधिकारी मंत्रालय यांना निवेदन देत लाक्षणिक आंदोलने उपोषण छेडत निद्रावस्थेत असलेल्या खात्याला जागे केले तद्नंतर मागील दोन वर्ष या कालव्याचे दुरुस्तीचे काम जोरदार सुरू असल्याचे समजते.तर उजवा तीर समजला जाणाऱ्या कालव्याची दरवर्षी ठेकेदाराला टेका देत साफसफाई आणि गाळ काढण्यात येतो मात्र ते काय दर्जाचे केले जातं यावर नियंत्रन नसल्याने चालू वर्षी केलेल्या दुरुस्तीच्या तसेच साफसफाईल कामाबाबत तसेच त्यावर लाखोंचा होत असलेल्या खर्चाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे...

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोलाड पाटबंधारे विभागाकडून अथवा जलसंपदा विभागाच्या वतीने ठेकेदार मार्फत उजवा तीर कालव्याची दुरूस्ती आणि सफाई करण्यात येत आहे तर काही ठिकाणी दुरूस्ती आणि साफसफाई तसेच गाळ काढणे व काही ठिकाणी रस्त्यालगत संरक्षण कट्टा बांधण्याचे काम सुरू असून यावर नियंत्रण कोणाचे केलेल्या कामाचा दर्जा काय आहे सारा गाल कचरा तसास तर देवकान्हे मालसई दरम्यान काढण्यात आलेल्या गाळ कचरा मार्गालगत ढिगारे च्या ढिगारे टाकण्यात आले आहेत त्यामुळे मार्गावरून रहदारी करणारे दुचाकी स्वार तसेच प्रवासी वाहतूकसाठी डोके दुखी ठरत असून अपघातांत कारण ठरत आहेत...

प्रतिक्रिया.

कोलाड़ पाठबंधारे विभागाने कलवा मोऱ्यांवर व् लाइनिगवर कोरोडो रूपये खर्च केले तर काही ठेकेदार अर्धवट काम करून पळून गेले तर काही निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत त्यातच पाठबंधारे विभागाने व्यापार धोरण स्वीकारले त्यांना शेतकरी बळीराजाशी काही घेणे देने नाही दरसाल करोड़ो रूपयांचा कंपन्यांकड़ूं पनिपट्टी मलीदा लाटला जातो त्याचा फायदा या विभागला व सरकारला देखील होतो शेकऱ्यांसाठी श्वासत पाणी पुरवठा होवा म्हणून साऱ्या योजना आल्या मात्र कोणतीही योजनेचा लाभ आजपर्यंत सिंचनाखालील शेतकरी बळीराजाला मिळाला नाही गोवे कोलाड़ धरनाचा प्रश्न ऐरणीवर त्यात पुई पुगांव खांब वगळता तालुक्यातील इतर शेतकरी वर्गासाठी म्हणजे सरासरी 700ते800 हेक्टर भातशेती निडी तर्फे अष्टमी शाखा व् किल्ला निवी भुवनेश्वर शाखा येथील शेती या अभावी उध्वस्त झाली कालव्याला पाणी येत नसल्याने विहीरी तलाव आटले जातात गेली तेरा ते चौदा वर्षात या विभागाकडून कालव्याचा गाल देखील काढला जातो दुरूस्ती केली जात आहे तर काही ठिकाणी मोर्यांची कामे अर्धवट येत्या काळात काम पूर्ण करून देतो ही शाश्वती केवळ कागदावर ती तोंडावर गेली तेरा ते चौदा वर्ष शेतकऱ्यांसाठी फॉल ठरली त्यामुळे येथील ग्रामस्थाना पाणी टंचाईचा प्रश्न मोठा निर्माण होत आहे नदी काठी गावे असून पाण्यासाठी धावा धाव होत आहे तसेच उन्हाली भात शेती नसल्याने समान्यांची रोजी रोटी हरपली, व या कामाबबतचा तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचा विचार शासनाने करवा अशी प्रतिक्रिया येथील अनेक प्रगतिशील शेतकरी तसेच सामासिक कार्यकर्ते खेळू ढमाल तुकाराम सानप,मारुती खांडेकर ,व गजानन गायकर चंद्रकांत लोखंडे दिनकर सानप यांनी दिली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post