लग्नसोहळ्यात राज्यमंत्री जयस्वाल यांची विशेष उपस्थिती
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- प्रसिद्ध रामधाम तीर्थक्षेत्रात मनसर येथे दरवर्षी मोठ्या उत्साहाने आदर्श सर्वधर्मीय सामूहीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे निःशुल्क स्वरूपात गोर-गरीब लोकांचे विवाह लावून देतात... या समाजसेवी कार्याला आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर, महिला व बाल विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प (महाराष्ट्र शासन) यांची प्रमुख मदत लाभते... सन २००५ पासून चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे आतापर्यंत सुमारे १३३९ जोडप्यांचे 'शुभमंगलम सावधान' रामधाम येथे झाले आहे... त्यात यंदाच्या २५ जोडप्पाची आणखी भर पडली आहे... दि. १८ एप्रिल २०२५ला २५ गरीब वर-वधूचे सामूहिक विवाह अत्यंत हर्षोउल्हासात वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने प्रमुख मान्यवरांचा उपस्थीत संपन्न झाले... जि.प.शाळेतून सर्व नवरदेवांना ट्रेलरवर बसवून डी. जे, बँड, आदिवासी नृत्याच्या तालावर नाचत त्यांची सामूहिकरित्या वरात काढण्यात आली... हिंदु, बौद्ध व आदिवासी समाजाच्या रितिरिवाजाने २५ जोडप्यांचे शुभमंगलम सावधान झाले... या मंगल प्रसंगी नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी राज्यमंत्री अँड. आशिष जयस्वाल यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली... तसेच माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, सृष्टी सौदर्य परिवारचे अध्यक्ष ऋषीकेश किंमतकर, डॉ अभिविलास नखाते, चंद्रशेखर भोयर, चंद्रशेखर वाटकुलेवार, माजी जि.प. सदस्य सतीश डोंगरे, सुरेश समर्थ, संजय पवार, ए.पी. दरवारे, रमेश लांजेवार, नरेंद्र धुवारे, शाम गायकवाड यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला... यांच्यासह विविध सामाजिक संस्थेचे व क्षेत्राचे पदाधिकारी उपस्थित होते... उपस्थित सर्व पाहुण्यांनी नवविवाहित जोडप्यांना शुभाशीर्वाद देऊन पुढील आयुष्याचा शुभेच्छा दिल्या... संचालन अनील वाघमारे यांनी केले...
मी आमदार झालो असतो तर...
एक लग्न कार्य उरकवतांना पालकांची आर्थिक तथा सर्वपरिने अक्षरशः दमछाक होत असते... तेव्हा चंद्रपाल चौकसे यांनी आजपावेतो हजारो विवाह सोहळे मोठ्या सहजतेने उरकविले असुन या कार्याबद्दल ते परीसरात कौतुकाचे मानकरी ठरलेले आहे... हे कार्य ते अविरत सुरु ठेवणार असल्याचेही ते लग्नसोहळ्या दरम्यान दोन शब्दीय भाषणात बोलले... यावेळी निवडणुकीदरम्यान खोटे आश्वासन देण्याऱ्या नेत्यांवर कठोर टिका केली व मी आमदार झालो असतो तर नवविवाहीत जोडप्यांना मिळणारे २५ हजाराचे आर्थिक सहाय्य एक लक्ष रुपयांवर नेले असते असे म्हणत तरी सुद्धा मी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे मागे लागुन १ लक्ष अर्थ सहाय्य करेल असेही चौकसे बोलले...
