महाराष्ट्र वेदभुमी

देयक द्या? जलजीवन मिशन योजनांची कामे संकटात!


सरपंच किरण टेकाम यांचा राज्यकर्त्यांना सवाल

एक एक आठवडा ग्रामस्थांना पाणी मिळेना

सचिन चौरसिया प्रतिनीधी

रामटेक :- जल जिवन मिशन अंतर्गत हर घर नल योजना राज्यकर्त्यांनी कार्यान्वित केली. त्याद्वारे ज्यांनी कधी स्वतःच्या घरी नळ पाहिला नव्हता त्यांनाही नळ व नळाद्वारे पाणि पाहायला मिळाले हे तेवढेच खरे असले तरी मात्र सध्या घडीला तालुक्याच्या काही भागात जल जिवन मिशन अंतर्गत करण्यात येत असलेली कामे खोळंबली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत सोनेघाट अंतर्गत दुधाळा गावात आठ आठ दिवस लोकांना पाणि मिळत नसुन तेथे जल जिवन मिशन अंतर्गत कामे खोळंबली आहे. कंत्राटदाराची बिलं राज्यकर्त्यांकडुन अदा न झाल्याने त्याने हात वर केले असुन गट ग्राम पंचायत सोनेघाट चे सरपंच श्री. किरण टेकाम यांनी ' जलजिवन मिशन अंतर्गत कंत्राटदारांची बिलं का थांबवता ? असा सवाल संताप व्यक्त करीत केलेला आहे...

        जल जिवन मिशन अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांसाठी केंद्र शासन व राज्य शासन निधी देत असतो. त्यातून कंत्राटदार जलजिवन मिशन ची कामे पार पाडत असतात व याद्वारे नागरीकांना नळ तथा नळाद्वारे स्वच्छ पाणी मिळत असते. असे असले तरी मात्र अनेक कंत्राटदारांची त्यांनी केलेल्या कामांची देयके ( बिलं ) राज्यकर्त्यांनी निधी न दिल्याने खोळंबली, परिणामस्वरूप पुढील कामे करण्यासाठी कंत्राटदारांनी चक्क नकार दिला. मजुर वर्ग थांबत नाही, त्यांना त्यांची रोजी द्यावीच लागते, मटेरिअल वाला किती दिवस थांबणार आहे, तो सुद्धा वारंवार पैशांसाठी फोन करतो. तेव्हा या सर्व भानगडीपेक्षा कामे थांबवलेलीच बरी असे म्हणत कंत्राटदारांनी काम करणे थांबवले असल्याचे व कामे पुर्ण न झाल्याने पाणिसमस्या उद्भवली असल्याचे सरपंच किरण टेकाम यांनी संताप व्यक्त करीत सांगितले. आजघडीला ग्रामस्थ माझ्या घरी चकरा मारून मला पाण्यासाठी जाब विचारत असुन त्यांना मी तरी काय उत्तर देऊ हे मला राज्यकर्त्यांनीच सांगावे असेही सरपंच किरण टेकाम यांनी संताप व्यक्त करीत यावेळी सांगितले...

दिवाळीनंतर सादर केलेले बिलच थांबलेः गुप्ता

याबाबद पाणीपुरवठा उपविभाग कार्यालय रामटेक येथील अभियंता संकेत गुप्ता यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सुरुवातीला दुधाळा गावामध्ये नियोजीत केलेल्या स्पॉटवर जलस्त्रोत लागले नाही, त्यामुळे आता दुसरे स्पॉट नियुक्त करण्यात आले आहे. स्पॉट चेंज झाल्यामुळे खर्चातही बदल होणार आहे. तसेच दिवाळीपूर्वी ज्या कंत्राटदारांनी आपली बिलं सादर केलेली होती त्यांची देयके निघालेली आहे, नंतर सादर केलेल्यांची बिलं प्रलंबीत असल्याचेही अभियंता गुप्ता यांनी सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post