सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : कविकुलगुरु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलाजी अण्ड सायन्स (किट्स) रामटेक येथे १७ एप्रिलला १९ विविध विद्यार्थी फोरम व असोसिएशनचा एकत्रित समारोप समारंभ संपन्न झाला... अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे होते... विद्यार्थी विभागाचे अधिष्ठाता डॉ. पंकज आष्टनकर, आयक्युएसी समन्वयक डॉ. यशवंत जिभकाटे, विद्या विभागाचे अधिष्ठाता डॉ. विलास महात्मे, विभाग प्रमुख, प्राध्यापकगण व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी विद्यार्थ्यांनी फोरमच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करून उत्कृष्ट कार्य केले आहे... व्यावसायीक शिक्षणासोबत छंद जोपासल्याने प्रतिमा निखारते... विद्यार्थ्यांनी जिद्द ठेवल्यानेच यावर्षी टेक्नोडीओनसारखा मोठा युवा महोत्सव होऊ शकला. असे सांगून विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे कौतुक केले... डॉ. पंकज आष्टनकर यांनी प्रास्ताविकातून १९ विविध फोरम, असोसिएशन व युनिट विषयी माहिती दिली... सामूहिक काम केल्याने मोठे यश मिळत असते असे ते म्हणाले... विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले... यशस्वीतेकरीता सर्व फोरम प्रमुख, विद्यार्थ्यांसह सर्वांनी प्रयत्न केले... संचालन रुद्रांश चंदनखेडे व खुषी जीवतोडे यानी केले... आभार सय्यद जुबेर यांनी मानले...
