माणगाव :- (नरेश पाटील) – माणगाव येथे जमाअते इस्लामी हिंद, रायगड व फलाही तंझिम माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ईद मिलन समारोह’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले... मंगळवारी, दिनांक १५ एप्रिल रोजी सायंकाळी महाड बँकेच्या मागील पटांगणात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रफिक पारणेकर (सचिव, भारतीय समाज विभाग, जमाअते इस्लामी हिंद – महाराष्ट्र) होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, नगरसेवक अजित तार्लेकर, माणगाव व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बाळा दळवी, सचिव रमेश जैन यांच्यासह अनेक व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...
कार्यक्रमाची सुरुवात हाफिज अब्दुल मुसावीर यांच्या कुरआन पठणाने झाली, तर त्याचा मराठी अनुवाद मकसूद मन्सूर शेख यांनी प्रभावीपणे सादर केला... डॉ. रफिक पारणेकर यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर रोजा, बंधुता आणि सामाजिक सलोख्याचे महत्त्व यावर आपले विचार मांडले...
यावेळी डी.वाय.एस.पी. सूर्यवंशी, लक्ष्मण दळवी आणि ऋतिक मोरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन जमाअते इस्लामी हिंद माणगाव व फलाही तंझिम माणगाव यांनी संयुक्तपणे केले होते... या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फसीहूद्दीन फलाही (जिल्हा आयोजक, रायगड), बशीर करेल (शहर अध्यक्ष, माणगाव) व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली...
कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित सर्व मान्यवर आणि नागरिकांना शीरकुर्मा वाटप करण्यात आला... कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन वकीलुद्दीन इनामदार यांनी केले...हा उपक्रम माणगावमध्ये सामाजिक ऐक्य,धार्मिक सहिष्णुता आणि सलोखा वृद्धिंगत करणारा ठरला...
