महाराष्ट्र वेदभुमी

राज्यमंत्री जयस्वालकडून डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंतीनिमित्त रामटेकचे आमदार, राज्याचे राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केले... बाबासाहेब आंबेडकरांचे महान कार्य देशाला सदैव प्रेरणा देऊन देशवासीयांना देशाप्रती कर्तव्याची जाणीव करून देत राहील असे प्रतिपादन केले... शिवसेना शहर प्रमुख राजेश किंमतकर,माजी नगरसेवक विकेंद्र महाजन, पुरुषोत्तम मेश्राम,शिवसेना उपशहर प्रमुख विश्वास पाटील, युवासेना शहर प्रमुख सौरभ सिंगणजुडे, माजी नगराध्यक्ष नलिनी चौधरी, अनिल वाघमारे, महेश बिसन, विनायक सावरकर, सुनिल देवगडे, अमित अंबादे, अतुल धामगाये, आश्विन सहारे, राधेश्याम साखरे, सुरेखा माकडे, मेघा निरूडवार, प्रियंका सांगोडे, शारदा इंदोरकर, सुशिल पडोळे, अतुल देवगडे, राहुल गुंढरे, राजेश नानोटे, उज्वला धमगाये, बंडू सांगोडे, देवचंद अंबादे, दिपक निरुडवार, यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते. तसेच रमाई बौद्ध विहार, विनोबा भावे वॉर्ड, रामटेक येथे पुष्पहार अर्पण करुन केले...

Post a Comment

Previous Post Next Post