सोगांव - अब्दुल सोगावकर: अलिबाग तालुक्यातील सोगांव येथील मापगांव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा माजी ग्रामपंचायत सदस्य वस्सीम कुर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल २०२५ रोजी १३४ व्या जयंती निमित्त सोगांव-सिद्धार्थ नगर येथील तक्षशिला बुध्द विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले...
यावेळी वसीम कुर यांच्या सोबत अभिवादन करण्यासाठी मापगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विजय भगत, मजीद कुर, माजी सदस्या स्नेहा रुत, अजित घरत, गितेश करळकर, नाना राऊत, शफी वाकनिस उपस्थित होते. याप्रसंगी वसीम कुर यांनी सोगाव येथील सर्व बौद्ध बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले...
फोटो लाईन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना वस्सीम कुर,
