महाराष्ट्र वेदभुमी

हर हर महादेवाच्या गजरात श्रीक्षेत्र भातसई नगरी दुमदुमली,महादेवीचे भगत गळ लाऊन आरूढ झाले,

 


हजारो भक्तांच्या उपस्थितीत गळाचा सोहळा.

श्याम लोखंडे रोहा रायगड: रायगड रोहा तालुक्यातील श्री क्षेत्र भातसई येथे महादेवीच्या यात्रेला जनसागर उसळला, हर हर महादेवाच्या गजरात भातसई नगरी दुमदमली, हजारो भक्तगण यात्रेकरूंच्या उपस्थितीत गळाचा सोहळा हा सोहळा तसेच तो क्षण हजारो नयनांनी भक्तीमय वातावरणात टिपला... 

रायगड रोहा तालुक्यातील श्री क्षेत्र भातसई येथील नवसाला पावणाऱ्या महादेवाचा यात्रा उत्सवास पालखी मंदिरात आल्याने देवीची आरती घेण्यात आली... गळ टोचलेले भाविक गळ लावण्याच्या ठिकाणी सहा वाजून वीस मिनिटांनी आले... सायंकाळी ६.४३ वाजताच्या सुमारास मुख्य गळ असलेले महादेवीचे भक्त कृष्णा पांडुरंग रटाटे (धाटाव) यांना मुख्य गळ लावण्यातआले. लाटेवर अधांतरी गळ लावुन हरहर महादेवचा गजर होताच अधांतरी फिरवण्यात आले... लाटेवर देवी अंगात आलेले चिंतामणी खरीवले अरुढ होते...यावेळी त्यांच्या सोबत खालचा यशवंत नारायण जोशी गळ (भातसई), भगवान कृष्ण शेळके (झोळांबे), संतोष रघुनाथ खरीवले (भातसई), संजय दुर्गाजी शिंदे (झोळांबे), संदीप दत्तात्रेय चौलकर (लक्ष्मीनगर) यांना लावण्यात आले...



Post a Comment

Previous Post Next Post