महाराष्ट्र वेदभुमी

जलयुक्त शिवार योजनेव्दारे नाला खोलीकरण व भूमिपूजन

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- जलयुक्त शिवार योजनेमुळे नाल्यामध्ये पाणी जास्तीत जास्त दिवस नदी साचून राहील व विहिरी कोरड्या पडणार नाहीत. त्याअंतर्गत गावाच्या पाणलोट क्षेत्रावर जल व मृद् संधारणाची कामे करावी लागतात... जलयुक्त शिवार योजने अंतर्गत आर्ट ऑफ लिव्हिंग व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम पंचायत हिवरा हिवरी येथे दि.१४ एप्रिल २०२५ रोजी हिवरा ते साटक नाला खोलीकरण व भूमिपूजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले... या कामामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या दूर होणार असून परिसरातील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे... यावेळी तहसीलदार रमेश कोळपे, सरपंच - सुनील गजभिये, आर्ट ऑफ लिव्हिंगचे रंजीत घिवतोंडे, कमलाकर हिंगे, रुखमांगत चाफले, मयुर दारोडे, रोशन मलेवार सह आदेश नाटकर, नारायण मलेवार, संतोष कुंभलकर, विष्णु काठोके, अंगद डडोरे, कमलसिंग ठाकरे सह स्थानिक गावकरी यावेळी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post