महाराष्ट्र वेदभुमी

जल्लोष रायगडच्या मातीचा;महादेवखार गावचा नाद एकच बैलगाडा शर्यत..

 


रोहा प्रतिनिधी नंदेश गायकर : तब्बल 11वर्षानंतर रायगड जिल्ह्यातील महादेवखार या गावी ता.12 एप्रिल 2025रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा निम्मित ग्रामस्थ महादेवखार यांच्या सौजन्याने आकर्षक असा बैलगाडा शर्यत थरार पाहण्याचा अनुभव रसिक मायबाप प्रेक्षकांना बघायला मिळाला...या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटक म्हणून रायगड जिल्हा शेकाप महिला आघाडी प्रमुख माननिय चित्रलेखा ताई पाटील यांनी स्विकारले... त्यांनी प्रोत्साहन पर भाषण केले त्यांचे सासरे माननिय जयंत भाई पाटील यांनीच शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव महा राष्ट्र  विधान भवनातून बैलगाडा शर्यती ची परवानगी मिळवली होती... म्हणुन आज या बैलगाडा शर्यती पाहायला मिळत आहेत...हौशी बैलगाडा मालक आपल्या जीवाची पर्वा न करता शर्यतीत आपला नंबर यावा या हेतूने सुसाट वेगाने आपल्या गाड्या हाकत होते... मैदानावर इतके हौशी प्रेषक, गाड्यांचा थरार पाहण्यासाठी आले होते की मैदान तुडूंब भरुन गेले होते... 100हून अधिक गाडामालक स्पर्धेत सहभागी झाले होते... सर्जा राजाची जोडी मैदानात तुफान पळत होती... प्रेक्षकांचा उस्ताह शिगेला पोहोचला होता... लोक क्वार्टर फायनल, ते फायनल पर्यंत शर्यती बघण्यासाठी आवर्जून थांबले होते इतका थरार अनुभव महादेव खार मैदानात पहिल्यांदाच प्रेक्षकांना बघायला मिळाला...

Post a Comment

Previous Post Next Post