मोटार सायकलच्या धडकेत दोघेजण जखमी, तर दुसरा मोटार सायकल स्वार फरार रोहा पोलीसांकडून नाकेबंदी...
रोहा प्रतिनिधी शहानवाज मुकादम : रोहा:दि:१२ एप्रिल २०२५ रोजी १६.३० वा. च्या सुमारास रोहा-साळाव रस्त्यावरील खुटल गावा जवळ दोन मोटार सायकलची जोरदार धडक.
सविस्तर,
चणेरे हद्दीतील मौजे खुटल गावा समोर टायर पंक्चर शॉप जवळ दोन मोटार सायकलच्या अपघातात मोटार सायकल क्र: MH.46.CQ.0641चे मोठे नुकसान झाले असून त्यावरील दोन स्वार जखमी झाले असून त्यांना उपकेंद्र कोकबण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे,तर दुसरा अज्ञात मोटार सायकलस्वार हा अपघाताच्या ठिकाणांहून फरार... फरार झालेला मोटार सायकल स्वार याचे दोन एटीएम कार्ड सदर अपघाताच्या ठिकाणांहून मिळाले असुन त्याचे नाव निकेश नंदकुमार धारवे असे आहे...
सदर घटनेची माहिती रोहा पोलीसांना मिळताच रोहा पोलीसांकडून फरार मोटार सायकलस्वार याचा शोध घेणे कामी पोलीसांकडून तात्काल नाकेबंदी करण्यात आली असुन सदर अपघाताच्या ठिकाणांहून अज्ञात फरार मोटार सायकल स्वार प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
तसेच फरार मोटार सायकल स्वार याचा घटनेच्या ठिकाणांहून मिळालेल्या एटीएम कार्डच्या मदतीनेच शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक श्री मारूती पाटील म्हणाले...

