मुंबई प्रतिनिधी: सतिश वि.पाटील: पेंडसेनगरमधील तरुणाचे न्यायाधीश परीक्षेत यश संपादन करणारे डोंबिवली, कल्याण परिसरातील सन्मित पाटील अलीकडच्या काळातील पहिलेच तरूण आहेत...सन्मित पाटील यांचे कौतुक करताना माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी आणि चोळे ग्रामस्थ डोंबिवली – ठाकुर्लीतील चोळेगावमधील मूळ रहिवासी असलेले, डोंबिवलीतील पेंडेसनगरमध्ये पाटीलवाडीत वास्तव्यात असलेले सन्मित सुनील पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेत यश संपादन केले आहे... अशा न्यायालयीन परीक्षेत यश संपादन करणारे डोंबिवली, कल्याण परिसरातील सन्मित पाटील अलीकडच्या काळातील पहिलेच तरूण आहेत...
सन २०२२ मध्ये सन्मित पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेली दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग स्पर्धा परीक्षा दिली होती... सन्मित पाटील यांच्या या यशाबद्दल त्यांचे ठाकुर्ली चोळेगाव, डोंबिवलीतील विविध स्तरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे... आपल्या मुलाने न्यायाधीश व्हावे, अशी सन्मित यांचे वडील सुनील पाटील यांची इच्छा होती... आता त्यांचे वडील हयात नाहीत... वडिलांच्या शब्दाप्रमाणे सन्मित यांनी वडिलांचा शब्द खरा करून आपल्या जीवनाची वाटचाल सुरू केली आहे...
सन्मित पाटील यांनी डोंबिवलीतील मंजुनाथ शाळेमध्ये इंग्रजी माध्यमातून माझे शालेय शिक्षण पूर्ण केले... प्रगती महाविद्यालयातून मी पदवीपर्यंतचे वाणिज्य शाखेचे शिक्षण पूर्ण केले... ठाणे येथील विधी महाविद्यालयातून तीन वर्षाचा कायदेविषयक (एल. एल. बी.) अभ्यासक्रम पूर्ण केला. वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण करताना त्यामध्ये न्यायालयीन विषय होते... तो अभ्यास करत असतानाच न्यायालयीन क्षेत्रातच जायचे असा निर्णय घेतला...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या न्यायादंडाधिकाऱ्यांंच्या संदर्भातील स्पर्धा परीक्षांमध्ये शैक्षणिक पात्रतेसह इतर कोणत्या अटी शर्ती असतात याची माहिती घेतली. त्याप्रमाणे त्या अटीशर्ती पूर्ण केल्या. न्यायादंडाधिकारी होण्यासाठीचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. नियमित अभ्यासाबरोबर अवांतर वाचन, न्यायालयीन पुस्तके, सामान्य ज्ञान, दैनंदिन मराठी, इंग्रजी वर्तमानपत्र वाचनावर भर दिला...
सन २०२२ मध्ये आपण लोकसेवा आयोगाची न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पदासाठीची परीक्षा दिली... या परीक्षेचा निकाल गेल्या महिन्यात लागला... आपणास या परीक्षेत यश मिळेल याची पूर्ण खात्री होती... ही परीक्षा दहा हजार विद्यार्थ्यांनी दिली होती... या परीक्षेच्या छाननीतून बाराशे विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले... गेल्या महिन्यात स्पर्धकांच्या चाळणीतून ३४२ विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात आली... या विद्यार्थ्यांमधून ११४ जणांची न्यायाधीश म्हणून अंतीम निवड करण्यात आली आहे... यामध्ये आपला क्रमांक आहे, असे सन्मित पाटील यांनी सांगितले...
चोळे गावातील तरुणाने न्यायाधीश पदाच्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल चोळे गावचे ग्रामस्थ माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, जनादर्न पाटील, मधुकर पाटील, अनंता राणे, लक्ष्मीकांत साळवी, बंटी पाटील यांनी पेंडसेनगर पाटीलवाडी येथे जाऊन सन्मित पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले... सन्मित यांची आई नंदा पाटील यांनीही मुलाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे... सन्मित यांचे मार्गदर्शक ॲड. गणेश शिरसाठ, ॲड. रंजित झुंझारराव, ॲड. सुजाता भोईर-म्हात्रे आणि कुटुंबीयांनी सन्मित पाटील यांचे कौतुक केले आहे...