सोगाव - अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील मुशेत येथे १६ व १८ एप्रिल २०२५ रोजी असे दोन दिवस जगदीश रघुनाथ सावंत, शिवसेना(शिंदे गट) मापगाव विभाग प्रमुख पुरस्कृत गावदेवी क्रीडा मंडळ मुशेत आयोजित अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी लीग २०२५, पर्व १ पहिले, कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाच्या मायटी वॉरियर मुशेत संघाने खेळामध्ये दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला...
पहिल्या दिवशी साखळी पद्धतीने पुरुष गटाचे सामने आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत पुरुष गटांच्या एकूण बारा संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस पाटील मुशेत अशोक करंजुकर यांच्याहस्ते व संतोष राऊत सर, विद्यमान पोलीस पाटील चंद्रशेखर सुर्वे, गितेश करळकर, विजय भगत, अनिल जाधव, मनीष म्हात्रे, जागृती सावंत, मोहिनी सावंत, उत्तम राऊत, विश्वास थळे, प्रमोद दळवी, उदय राऊत, दिनेश राऊत या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले...
तर दुसऱ्या दिवशी मुशेत गावात दुःखद घटना घडल्यामुळे दुसऱ्या दिवशीची स्पर्धा रद्द करून तिसऱ्या दिवशी म्हणजेच १८ एप्रिल रोजी स्पर्धा घेण्यात आल्या. तिसऱ्या दिवशीच्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह व रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते....
स्पर्धा काळात खेळाडूंना व आयोजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अलिबाग मुरुड रोहा मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी, संतोष राऊत सर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ऍड. महेश मोहिते, किहीम सरपंच पिंट्या गायकवाड, डॉ. किरण शेटे, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विजय भगत, माजी उपसरपंच अशोक नाईक, वसीम कुर, माजी सदस्य मजीद कुर, जगन्नाथ पाटील, अजित घरत, इलियास हाफिज, प्रकाश गुळेकर, संजय सोनवणे, प्रशांत सकरे, गितेश करळकर, प्रभाकर मोहिते, विश्वास थळे, माजी सदस्या स्नेहा रुत, मंगेश राऊत, रमेश थळे, उत्तम राऊत, सामाजिक कार्यकर्ते मुद्स्सर कुर, राजेश परब, सुहास लाड, दत्तात्रेय राऊत, मंगेश मापगावकर, मंगेश उकरूळकर, मंगेश सुतार, मनोज काठे, तेजस काठे, सुमेश थळे, राकेश करळकर, कल्पेश राऊत, वेदांत भगत, मनीष म्हात्रे, जितेंद्र करंजुकर, रुपेश निर्गुण, परेश सुर्वे, संतोष रुत, स्वप्नील थळे, महेश सावंत, प्रमोद थळे, जितेंद्र ठाकूर, अनिल जाधव, सुनिल अनमाने, सुधाकर मल्हार, मयूर मोरे आदी मान्यवर व पंचक्रोशीतील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांसाठी घेण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेत एकूण चार संघांनी सहभाग घेतला होता...
महिलांच्या कबड्डी स्पर्धेत अंतिम सामना ओमकार वेश्वी व दिलखूष आवास संघ यांच्यात होऊन ओमकार वेश्वी या संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक दिलखूष आवास संघाने पटकावला, तृतीय क्रमांक भिलेश्वर किहीम संघाने पटकावला, तसेच चतुर्थ क्रमांक टाकादेवी मांडवा संघाने पटकावला. यामध्ये उत्कृष्ट पक्कड म्हणून दिलखूष आवास या संघाची प्रिती पाटील यांनी पटकावले.
पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेत अंतिम सामना मायटी वॉरीयर मुशेत व नागेश्वर आवास यांच्यात होऊन मायटी वॉरीयर मुशेत या संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक नागेश्वर आवास या संघाने पटकावला, तृतीय क्रमांक श्री गणेश खंडाळे या संघाने पटकावला तसेच चतुर्थ क्रमांक डी. एन. रिसॉर्ट सातीर्जे या संघाने पटकावला. यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मायटी वॉरीयर मुशेत या संघाचा गौरव सुतार याने पटकावले तर उत्कृष्ट पकड म्हणून नागेश्वर आवास संघाचा प्राण भगत याने पटकावले, उत्कृष्ट चढाई म्हणून डी एन रिसॉर्ट या संघाचा हितार्थ मढवी याने पटकावले तसेच पब्लिक हिरो म्हणून मायटी वॉरीयर मुशेत या संघाचा रोहित पाटील याने पटकावले. सर्व विजेत्या संघांना व स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम पारितोषिक व आकर्षक चषक देण्यात आले...
कबड्डी स्पर्धेत जगदीश सावंत यांनी सर्व खेळाडू व कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या सर्व कबड्डी प्रेमींची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची विशेष खबरदारी घेऊन आयोजन व नियोजन उत्तमरीत्या केले होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिवसेना(शिंदे गट)मापगाव विभाग प्रमुख जगदीश सावंत यांनी व अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी लीगच्या कार्यकारिणीने मोलाचे सहकार्य केले. तसेच गावदेवी मुशेत तसेच मुशेत ग्रामस्थ मंडळाने विशेष मेहनत घेतली. दोन दिवस संपूर्ण स्पर्धेचे समालोचन अंकुर घरत व संजय म्हात्रे यांनी केले तर सूत्रसंचालन अजित हरवडे सर यांनी केले...
फोटो लाईन : मुशेत येथील कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता मायटी वॉरीयर मुशेत संघाला पारितोषिक देतांना उपस्थित मान्यवर,