सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- नागपूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असून रामटेक तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या पाच वर्षाच्या कालावधीसाठी होणाऱ्या ४८ ग्रामपंचायतीच्या व थेट जनतेतून निवड होणाऱ्या सरपंच पदाची आरक्षण सोडत सोम. दि.२१ रोजी घनश्यामराव किंमतकर सभागृह, आझाद वार्ड रामटेक येथे पार पडली असून माहिती तहसिलदार रमेश कोळपे यांनी दिली. त्यानुसार ग्रामपंचायत भंडारबोडी येथे अनुसुचित जाती, डोंगरी येथे अनुसुचित जाती (स्त्री), चिचाळा येथे अनुसुचित जाती, उमरी येथे अनुसुचित जाती (स्त्री), आजनी येथे अनुसुचित जाती (स्त्री), कट्टा येथे अनुसूचित जमाती (स्त्री), बांद्रा येथे अनुसुचित जमाती, खनोरा येथे अनुसुचित जमाती, पुसदा पुनर्वसन २ येथे अनुसुचित जमाती, टांगला (चिकनापुर ) येथे अनुसुचित जमाती, दाहोदा येथे अनुसुचित जमाती, बेलदा येथे अनुसुचित जमाती, बोथिया पालोरा येथे अनुसुचित जमाती, पुसदा पुनर्वसन १ येथे अनुसुचित जमाती, देवलापार येथे अनुसुचित जमाती, वरघाट येथे अनुसुचित जमाती (स्त्री ), डोंगरताल येथे अनुसुचित जमाती (स्त्री), पिपरिया येथे अनुसुचित जमाती (स्त्री), पिंडकापार (लोधा) येथे अनुसुचित जमाती (स्त्री), करवाही येथे अनुसुचित जमाती (स्त्री), सालई येथे अनुसुचित जमाती (स्त्री), वडांबा ( माल) येथे अनुसुचित जमाती (स्त्री), बोरडा येथे अनुसुचित जमाती (स्त्री), लोहडोंगरी येथे ना.मा.प्र. (स्त्री), पथरई येथे सर्वसाधारण (स्त्री), महादुला येथे सर्वसाधारण (स्त्री), पंचाळा (खुर्द) येथे सर्वसाधारण, कांद्री येथे सर्वसाधारण, खैरी बिजेवाडा येथे सर्वसाधारण (स्त्री), खुमारी येथे सर्वसाधारण, हिवरा बाजार येथे सर्वसाधारण, सोनेघाट येथे सर्वसाधारण (स्त्री), शिवणी (भोंडकी) येथे सर्वसाधारण (स्त्री), मांद्री येथे सर्वसाधारण (स्त्री), पटगोवारी येथे सर्वसाधारण (स्त्री), मनसर येथे सर्वसाधारण (स्त्री), पिंडकापार (सोन.) येथे सर्वसाधारण (स्त्री), नवरगाव येथे सर्वसाधारण, मुसेवाडी येथे सर्वसाधारण, बोरी येथे सर्वसाधारण, भिलेवाडा येथे सर्वसाधारण, काचुरवाही येथे सर्वसाधारण, शितलवाडी येथे सर्वसाधारण, आसोली येथे सर्वसाधारण, हिवरा हिवरी येथे सर्वसाधारण (स्त्री), नगरधन येथे सर्वसाधारण, किरणापुर येथे सर्वसाधारण (स्त्री), मानापुर येथे सर्वसाधारण स्त्री असे या ४८ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण जाहीर झालेले आहे...