महाराष्ट्र वेदभुमी

रोह्यात वरदायी कीर्तन अमृत महोत्सव, टाळ मृदुंगाच्या गजरात खेळ फुगडी


गौळणीवर वरदाताई ,अनिकेतभाई दंग,भक्तिरसात रोहेकर तल्लिन, 

कोलाड (श्याम लोखंडे) रायगड जिल्ह्यातील रोहा नगरी तीन दिवस टाळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमली भक्ती रसात रोहेकर तल्लीन वरदायी कीर्तन अमृत महोत्सवात सौ वरदाताई तटकरे, अनिकेत तटकरे भक्ती रसात दंग होत हरिपाठ कार्यक्रमानंतर खेळ फुगडी गौळणीवर तल्लीन होऊन भक्तिमय वातावरणात लुटला आनंद...


रोहा कुंडलिका नदी संवर्धन येथे गेली तीन दिवस भक्तिमय वातावरणात संपन्न झालेला वरदाई कीर्तन अमृत महोत्सव गजर कीर्तनाचा या आध्यात्मिक कार्यक्रमाला भक्तीचा महापूर प्राप्त झाल्याचे रोहा रायगड सह संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले रोहा नगरीत जणू काही धाकटी पंढरीच अवतरली असा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची रसाळ वाणी, गायनाचार्य यांचा सुमधुर आवाज तसेच, मृदुंगमणी यांच्या पखवाज वादकाचा गोड वाद्य कलेत सारेच नाहले. एवढेच नव्हे तर हरिपाठ कार्यक्रमात चक्क खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि मा.आमदार अनिकेत भाई तटकरे, यांनी हाती टाळ घेऊन विठुमाऊलीच्या गजरात तल्लीन झाले.तर सांगता समारोह प्रसंगीच्या कार्यक्रमात दस्तुरखुद स्वतः वरदाताई तटकरे यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात तसेच गायनाचार्य यांनी सुमधुर आवाजात गायलेली खेळ फुगडी गौळणीवर तल्लीन होत फुगडी खेळतात सहभागी होत वारकरी मंडळींसमवेत आनंद लुटला तर अनिकेत तटकरे यांनी देखील मोठा आनंद घेतला...


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे लोकप्रिय खासदार कोकणचे भाग्यविधाते सुनिल तटकरे यांच्या पत्नी सौभाग्यवती वरदा तटकरे यांच्या ६१व्या वाढदिवसाचे औचित्य साधून अभिष्टचिंत सोहळा मंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेतभाई तटकरे आणि रोहा तालुका वारकरी संप्रदाय यांच्या वतीने वरदाई कीर्तन अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांनी आपली कीर्तन सेवा वेळेवर रुजू करत सुंदर विवेचन करून मंत्र मुग्ध केले. कार्यकमाला रोहेकर नागरिकांनी मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात प्रतिसाद देत जणू काही भक्तीचा महापूर उसळला...

तर गेली तीन दिवस रंगणाऱ्या या कीर्तन महोत्सवात रविवारी २० एप्रिल हभप बाळकृष्ण दादा वसंत गडकर महाराज (सातारा) यांचे किर्तनसेवा,मृदंगाचार्य ह.भ.प. कृष्णा महाराज भोरकडे, व गायनाचार्य हभप कैलास महाराज पवार, सोमवार दि २१ एप्रिल रोजी नामवंत कीर्तनकार आवाजाचे जादुगार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलडाणा),  मृदंगाचार्य हभप विकास महाराज बेलुकर गायनाचार्य हभप नारायण महाराज खिल्लारी, तर मंगळवार दि २२एप्रिल रोजी हभप सौ कांचनताई माऊली जगताप (नाशिक) यांचे कीर्तनसेवा मृदंगाचार्य हभप विकास महाराज बेलुकर, व गायनाचार्य हभप नारायण महाराज खिल्लारी, रविंद्र मरवडे वैभव खांडेकर,अशा नामवंत कीर्तनकार, गायनाचार्य आणि मृदुंगमणि यांच्या वाद्यरूपी कला यांची साथ तसेच तालुक्यातील टाळकरी फडकरी मंडळी यांची साथ या कार्यक्रमाल लाभणार आहे...

आयोजित वरदायी कीर्तन अमृत महोत्सव कार्यक्रमाप्रसंगी यावेळी वारकरी संप्रदाय परंपरा जोपासली तसेच ती तरुणांपर्यंत रुजवत आहेत अशा तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार गायनाचार्य मृदुंग मनी यांचा सत्कार, त्याच बरोबर या कार्यक्रमाचे औचित्य साधून अभिष्टचिंत सोहळा म्हणून तालुक्यातील दहा पंचक्रोशीत वारकरी संप्रदाय परंपरा म्हणून टाळ, वीणा,आणि पखवाज वाद्य भेट देऊन सन्मानित करण्यात आले...


२० ते २२ एप्रिल या कालावधीत संपन्न झालेल्या धार्मिक तथा आध्यात्मिक वरदायी अमृत कीर्तन महोत्सव या कार्यक्रमाचे आमदार अनिकेत तटकरे यांनी उत्तम नियोजन केले. कोणत्याही भाविकांची गैरसोय होऊ नये, सर्वांना कीर्तनाचा लाभ घेता यावा, यासाठी रोहा तालुका वारकरी संप्रदाय पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले . तसेच उपस्थित भाविक भक्तगणांची भोजनाची व महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करत तटकरे कुटुंबांनी स्वतः लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत होते...

या कार्यक्रमात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे व जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील, तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर, अनंतराव देशमुख, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, कार्याध्यक्ष समीर शेडगे, उप नगराध्यक्ष महेंद्र दिवेकर, महेश कोलाटकर, महेंद्र गुजर, अमित उकडे, सरपंच रामा म्हात्रे, प्रीतमताई पाटील, सुरेश मगर, अमित घाग,अमित उकडे, रोहा तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष महादेव सानप व त्यांचे सर्व पदाधिकारी यांसह वारकरी संप्रदाय मंडळींनी सहभागी होऊन हरिपाठ, कीर्तनाचा लाभ घेतला. तसेच या प्रसंगी तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदुगमणी यांचा या अमृत कीर्तन महोत्सव कार्यक्रमात तटकरे परिवांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आले.भव्य दिव्य आणि देखणा कोणाची नजर ना लागो असा हा कार्यक्रम हजारोंच्या संख्येने श्रोते यांच्या उपस्थित भक्तीच्या ओघात संप्रदाय मंडळी व रोहेकर नागरिक भक्ती सागरात तल्लीन होऊन आनंद लुटला...

रोह्यात प्रथमच वरदायी कीर्तन अमृत महोत्सवाचे  आयोजन करण्यात आले होते यात रोहेकर मंत्र मुग्ध झाले तर विशेषतः गायनाचार्य खिल्लारी महाराज यांच्या सुश्राव्य आवाजाने तसेच विकास महाराज बेगळुकर यांच्या मृदुंग वाद्यात सारेच भारावून गेले...

Post a Comment

Previous Post Next Post