श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- नागपुर येथील संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतराच्या प्रस्तावाला,” श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेच्या अध्यक्षा कांचनमाला माकडे यांच्या नेतृत्त्वात संघटनेच्या वतीने रामटेक तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, नागपूर यांनी दि.१८ मार्च २०२५ रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार,संस्थेच्या नावात बदल करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र या नामांतराच्या निर्णयाला श्री संताजी अखिल तेली समाज रामटेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून, रामटेक तहसिलदार रमेश कोळपे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवुन संस्थेचे मूळ नाव संत जगनाडे महाराज कायम ठेवण्याची मागणी केली आहे.
निवेदन देतेवेळी मोरेश्वर माकडे, दुर्गेश मेंघरे, श्रीराम वाघुलकर, अरविंद अंबागडे, नानाभाऊ उराडे आदींसह संघटनेचे इतर पदाधिकारी तसेच सदस्यगण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...
जगनाडे महाराजांचे कार्य प्रेरणादायी
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आणि साहित्य हे प्रेरणादायी असून संतांनी कधीही कोणत्या एका समाजासाठी काम केले नाही. संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. आज समाजात घडत असलेल्या अनुचित घटना लक्षात घेता समाजाला खऱ्या अर्थाने संत विचारांची गरज आहे. आपल्या किर्तनाच्या माध्यमातून तसेच संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतून जनजागृती केली. संत जगनाडे महाराज यांचे समाजाला त्याकाळात शिक्षित करण्याचे कार्य आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचे कार्य कुठेतरी मिळतेजुळते आहे. संत परिवारातील सर्वश्रेष्ठ संत म्हणून त्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे. वारकरी संप्रदायातील श्री संत जगनाडे महाराज हे तेली समाजाचेसुध्दा दैवत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने तेली समाजाचा, वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्रातील संत पुरोगामी विचारांचा सन्मान करूण औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर या शासकीय संस्थेचे श्री संत जगनाडे महाराज असे पूर्वीप्रमाणे जैसे थे ठेवण्यात यावे, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे...
