महाराष्ट्र वेदभुमी

वायशेतजवळ झालेल्या अपघातातील केतन भगतचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू,

 


दुःखद घटना,परिसरात शोककळा

सोगाव -अब्दुल सोगावकर : अलिबाग रेवस मार्गावर २ एप्रिल रोजी दुचाकी व चारचाकी वाहनामध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेला झिराड येथील केतन भगत या तरुणाने उपचारादरम्यान मृत्यूशी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली. रविवार दि. ६ एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारास त्याचे पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले...

         अपघातानंतर केतन भगत याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र गंभीर जखमी झालेल्या केतन भगतला अधिक उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते, त्याच्यावर अधिक उपचार सुरू असताना उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने रविवार ६ एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारास निधन झाले, त्याच्या पार्थिवावर सोमवार दि. ७ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेदरम्यान झिराड येथील आपल्या मूळगावी असलेल्या स्मशानभूमीत मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यदर्शनासाठी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील तसेच नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. केतन भगत याच्या पश्चात आई व एक विवाहित बहीण व इतर नातेवाईक असा मोठा परिवार आहे. त्याच्या निधनाने भगत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे...

फोटो लाईन : वायशेत जवळपास झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेला झिराड येथील केतन भगत,

Post a Comment

Previous Post Next Post