८ ट्रक महसुल विभागाच्या ताब्यात
रेती माफियाला कुणाचे पाठबळ?
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- रामटेक तालुक्यातील मध्यप्रदेश, तुमसर व गोंदिया या भागातून अवैध रेती वाहतूक करत असणाऱ्या महसूल व पोलीस विभागाने संयुक्त कारवाही करून अवैध रेती उत्खनन व्यवसाय करणाऱ्या ८ ट्रक महसुल विभागाने ताब्यात घेतले असून कार्यवाही करून त्या ट्रकाना तहसील कार्यालय रामटेक येथे जप्त करून ठेवण्यात आले आहे...
अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणा-या वाहनांची संख्या वाढल्याची बाब निदर्शनास येत होती... त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, यांचे नेतृत्वात तहसिलदार रामटेक रमेश कोळपे व अप्पर तहसिलदार देवलापार पुनम कदम यांचे नियंत्रणात २ पथक नेमण्यात आले... सदर कार्यवाही दरम्यान मानेगाव टेक मार्गे नागपूर कडे येणा-या गाडयाकरीता खुमारी टोल नाका या ठिकाणी एक पथक नेमण्यात आले... तसेच तुमसर-भंडारा या भागाकरीता घोटीटोक या ठिकाणी दुसरे पथक नेमण्यात आले. उपरोक्त कार्यवाही दरम्यान गाडी क्रमांक एमएच ४९ सीफ ९८०८, एमएच ४० सीफ ८६९६, एमएच ४० डीए २३०५, एमएच ४० बीजी ९४९१, एमएच ३४ बीजी ९२२८, एमएच ३४ सीफ ८३६०, एमएच ३४ बीजी ९१३६, एमएच ४९ बीझेड ४९६१ अश्या एकूण ८ गाडया अवैध रेती वाहतूक करतांना पकडण्यात आल्या...
सदर वाहनांपैकी एम'एच ३४ बीझेड ९२२८ हे वाहन चोरबाहुली या ठिकाणी गाडीतील रेती रस्त्याच्या बाजूस टाकून जबलपूर रस्त्याच्या दिशेने पळून जात असतांना रमेश कोळपे तहसिलदार,रामटेक व नारायण तुरकूंडे सहा. पोलीस निरीक्षक देवलापार यांनी सावरा गावांत रात्री १२.३० पर्यत पाठलाग करून पकडले व डिटेन केले... इतर वाहने तहसिल कार्यालय रामटेक येथे जमा करण्यात आले असून सदर वाहनांवर महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ व कलम ४८(७) (८) अन्वये दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल... या कार्यवाही बद्दल जिल्हाधिकारी नागपूर यांनी रामटेकच्या पथकाचे अभिनंदन केले... तसेच नागरिकांमध्येही या कार्यवाहीमुळे प्रशासनाचे आभार व्यक्त केले जात आहे. पथकामध्ये मुनेश बांगर मंडळ अधिकारी, लिलेश ठाकूर तलाठी, बापूराव खंडारे तलाठी, प्रशांत बलसुरे तलाठी, प्रतिक बागडे तलाठी, शैलेश धमगाये महसूल सहायक, सुनिल जाधव महसूल सहायक, जांभुळे शिपाई, चंद्रमणी वाहणे शिपाई यांनी कार्यवाही केली...
