महीला दिनानिमीत्य स्काऊट गाईड द्वारे आयोजन
विद्यार्थ्यांनी गिरविले व्यवहाराचे धडे
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- महिला दिनानिमित्त स्काऊट गाईड च्या माध्यमातून समर्थ माध्यमिक शाळेत खरी कमाईचा कार्यक्रम आयोजित केला गेला. वर्ग ७ च्या अ, ब, क तुकडीतील पन्नास विद्यार्थ्यांनी विविध पदार्थांचे स्टॉल लावुन यावेळी व्यवहाराचे ज्ञान आत्मसात केले व यातुन झालेली नफ्याची रक्कम स्काऊट गाईड च्या जिल्हा कार्यालय, नागपुर येथे जमा केली.
कार्यक्रमाला समर्थ हायस्कुल चे उपमुख्याध्यापक श्री गायकवाड सर, पर्यवेक्षिका सौ. फंदे मॅडम, विभाग प्रमुख सौ. व्ही. किंमतकर मॅडम तसेच मिडलस्कुल विभागातील सर्व शिक्षक उपस्तित होते. उपस्थित सर्व महिला शिक्षिकांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व नंतर विद्यार्थ्यांच्या स्टॉलचे निरीक्षण करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी लावण्यात आलेल्या स्टॉल मध्ये वर्ग ७ च्या अ तुकडीतील पेट्रोल नेम लॉयन या गटाने आपल्या स्टॉल च्या माध्यमातुन सर्वाधिक खरी कमाई करून विजयाचा मान मिळविला. या गटातील त्रिनेत्र बावनकर, वंश हिंगे, वैभव लेंडे, रुद्र पतंगे, देवांशु श्रावणकर, तनुज कुहीटे, रितीक गायकवाड हे विद्यार्थी शाळा व्यवस्थापनातर्फे सत्काराचे मानकरी ठरले. पन्नास विद्यार्थ्यांनी एकुण बारा स्टॉल यावेळी लावले होते. उल्लेखनीय बाब अशी की शाळेतील शिक्षक, शिक्षीकांनी विद्यार्थ्यांना खरी कमाई कार्यक्रमाबाबद प्रोत्साहीत करून एकप्रकारे व्यवहाराच्या ज्ञानाचे धडे दिले...
